शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे-पालघर जिल्ह्यांत ९४५७ कुपोषित

By admin | Updated: November 28, 2015 22:33 IST

ठाणे-पालघर जिल्ह्यांत नऊ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आहेत. यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह (पालघर) शहापूर (ठाणे) येथे असून १०० टक्के महापालिकेचे कार्यक्षेत्र

- सुरेश लोखंडे,  ठाणेठाणे-पालघर जिल्ह्यांत नऊ हजार ४५७ बालके अतिकुपोषित आहेत. यापैकी सर्वाधिक बालके जव्हारसह (पालघर) शहापूर (ठाणे) येथे असून १०० टक्के महापालिकेचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे तालुक्यातही तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेले हे कुपोषण कधीच संपणे अपेक्षित होते. परंतु, त्यासाठी दरवर्षी शेकडो कोटी खर्च होऊनही कुपोषणाचा आलेख अल्पसा कमी झाला. पण, मेळघाटानंतर येथील कुपोषणाचाच नंबर लागतो. अल्पवयीन मातांच्या पोटी जन्माला आल्याने ही बालके कुपोषित असल्याचे कारण सांगून प्रशासन आपला बचाव करीत आहे. सर्वसाधारण बालके, मध्यम कमी वजनाची बालके, तीव्र कमी वजनाची बालके या तीन टप्प्यांत बालकांची वर्गवारी करून ‘कुपोषण’ शब्दाची तीव्रता कागदोपत्री कमी करण्याचे काम मात्र यंत्रणेने केले आहे.ठाणे जिल्ह्यातील ५ वर्षांपर्यंतच्या एक लाख २९ हजार ६८८ बालकांपैकी एक लाख २९ हजार १९४ बालकांचे वजन केले. त्यात एक हजार ७२६ बालके तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित आढळली. सर्वसाधारण श्रेणीतील एक लाख सहा हजार ७९३, तर मध्यम कमी वजनाची नऊ हजार ४३८ बालके सर्वेक्षणाअंती उघड झाली.यातील सर्वाधिक बालके शहापूर तालुक्यासह डोळखांब आणि भिवंडी तालुक्यातील आहेत. पालघर जिल्ह्यात दोन लाख १० हजार ७७६ बालकांपैकी दोन लाख दोन हजार ४०३ बालकांचे वजन घेतले असता त्यातून सात हजार ७३१ बालके तीव्र कमी वजनाची आढळली आहेत. उर्वरित सर्वसाधारणमध्ये एक लाख ५६ हजार ३१ तर मध्यम कमी वजनाची ३८ हजार ६४१ बालके महिला बाल कल्याण विभागाच्या सर्वेक्षणाअंती प्राप्त झाली आहेत. तब्बल दोन दशकांनंतरही जव्हार तालुक्यात सर्वाधिक बालके कुपोषणग्रस्त आहेत.पालघर जिल्ह्यातील १३ प्रकल्पांतील बालके तलासरी-४५९, जव्हार(१ )-८११, जव्हार (२) -८३८, विक्रमगड - ११६३, मोखाडा ५३५, डहाणू-८२९, कासा -७२६, वाडा- ४०४, पालघर -३९१, मनोर -४९३, वसई(१)- १७६, वसई (२) -४३०ठाण्यातील १0 प्रकल्पातील बालके शहापूर- ५६५, डोळखांब -४०४, मुरबाड- ८९, मुरबाड -२१३९, भिवंडी (१)- ५२ भिवंडी (२)-३१६, ठाणे(१)-१७, ठाणे (२)- २३, अंबरनाथ- २३, कल्याण - १२१