शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

८८२ मालमत्ता जप्त, ठामपाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:08 IST

ठाणे महापालिकेने मालमत्ताकर व पाणीकर वसुलीची मोहीम तीव्र केली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून आतापर्यंत ८८२ मालमत्ता जप्त केल्या

ठाणे : ठाणे महापालिकेने मालमत्ताकर व पाणीकर वसुलीची मोहीम तीव्र केली असून देयके न भरणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करून आतापर्यंत ८८२ मालमत्ता जप्त केल्या असून सुमारे १५९ मालमत्ता सील केल्या आहेत. शिवाय ९८ नळजोडण्याही खंडित केल्या आहेत. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ताकर आणि पाणीकराची थकबाकीची रक्कम तत्काळ भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापलिका प्रभागनिहाय ही कारवाई करीत आहे. नागरिकांना मालमत्ताकर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत महापालिकेची सर्व कर संकलन केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी (२१ मार्च, २०१९ वगळून) पूर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कार्यान्वीत राहणार आहेत. तसेच ज्या गृहसंकुलात, उद्योग संकुलात मालमत्ताकराची सदनिका, युनिटनिहाय स्वतंत्र बिले दिली जातात, अशा गृहसंकुल, उद्योग संकुलात मालमत्ता करवसुलीचा कॅम्प संबंधितांच्या विनंतीनुसार आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ताकर विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.>२०१८-१९ या आर्थिक वर्षात कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आढावा बैठकीत दिले होते. पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरु केली आहे. थकबाकीदारांनी याचा धसका घेतला आहे.महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर आॅनलाईन मालमत्ताकर भरण्याची सुविधा आहे. मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले.