शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरात सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस; भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग

By अजित मांडके | Updated: September 16, 2022 15:20 IST

भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारीही ठाणे शहरात कहर सुरू ठेवला. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या सहा तासात ८७.३८ मिमी पावसाची नोंद झाली असून यामध्ये कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झालेली नाही. तर ठाणे शहरातील सखल भागांसह अन्य पाच ठिकाणी पाणी साचले, एक ठिकाणी टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले तर दोन घटनांमध्ये झाडांच्या फांदया दोन दुकानांसह एक चारचाकी गाडीवर कोसळल्या आहेत. याचदरम्यान भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तरी प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत.

गेल्या चोवीस तासात ठाणे शहरात ५९.६६ मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दिवसभर सुरूच होता. याचदरम्यान सकाळी ८.३० ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास म्हणजे सहा तासात ८७.३८ मिमी पाऊस झाला. यामध्ये साडेबारा ते दीड या एक तासात २२.८६, तसेच दीड ते अडीच या तासभरात २१.०९ मिमी पावसाची नोंद झाली तर सकाळी साडे आठ ते साडेअकरा दरम्यान ४१.१४ मिमी पाऊस झाला. मात्र साडेअकरा ते साडेबारा या एक तासात अवघा २.२८ मिमी पाऊस झाला आहे. 

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शहरातील सखल भागांसह टेकडी बंगला, भास्कर कॉलनी, उथळसर गवळी वाडा,चितळसर पोलीस ठाण्याच्या आवारात,मुंब्रा ठाकुर पाडा आणि जुना आरटीओ ऑफिस परिसरात पाणी साचले होते. या घटना सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यानच्या आहेत. तर सावरकर नगर येथे झाडाची फांदी दोन दुकानावर तसेच वसंत विहार येथे झाडाची फांदी चारचाकी गाडी पडली होती. याशिवाय दिवा बेतवडे गाव येथे टोरंटच्या केबलवरती झाड कोसळले असून ते झाड कापून बाजूला करण्यात आले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

भातसा धरणातून पाण्याचा विसर्गगुरुवारीपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू आहे. भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी १.२५ मीटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासोबतच, सापगाव पूल बुडणार नाही अश्या पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, अजून पावसाचा जोर वाभढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल. तरी सापगाव पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती येण्याची शक्यता पाहून, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना  देण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस