शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे, आतापर्यंत एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 06:08 IST

ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या होत्या.

पंकज रोडेकर ठाणे : महाराष्ट्रापाठोपाठ ओडिशा येथेही पेट्रोल पंपांवर मापात पाप होत असल्याने, मध्यंतरी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील ८६ पेट्रोल पंपांना नोटिसा बजावल्या होत्या. या प्रकरणाचा पसारा दिवसेंदिवस वाढल्याने, त्याचा तपास ओडिशा पोलीस दलाकडे देण्याबाबत ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी विचाराधीन होते, असे वृत्त ‘लोकमत’ने पहिल्यांदा दिले होते. ते वृत्त खरे ठरले असून, त्यानुसार,‘त्या’ ८६ पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे आता ठाणे शहर पोलिसांना महाराष्ट्रातील पेट्रोल पंप घोटाळ्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पेट्रोल पंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सर कार्ड, मदरबोर्ड, कंट्रोलकडे की, पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत कारवाई करून गुन्हा दाखल केल्यानंतर, राज्यभरात ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या पथकांनी छापे टाकले. याचदरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एस्सार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोल पंपांवर कारवाई केली आहे.>या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागल्याने, त्या पेट्रोल पंपांचा तपास ओडिशा पोलिसांकडे सुपुर्द करण्याचा विचार सुरू झाला होता. त्यानुसार, तो तपास अखेर वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.