शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८४ वर्षांच्या ‘लखोबा लोखंडे’ला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 04:24 IST

लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ४४ वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख ७८ हजार रुपये उकळणा-या ८४ वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामट्याला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पुण्याच्या चिंचवड (मूळ रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) भागात राहणा-या या भामट्याने ठाण्याच्या शिवाजीनगर भागातील या महिलेला ४ फेब्रुवारी २०१६पासून लग्नाचे आमिष दाखवले. चिटणीस याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्याला असलेल्या स्वाती राणे (५५) या महिलेच्या मदतीने तिच्याकडून ७० हजारांची रोकड घेतली. तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्या बँक खात्यातूनही तीन लाख ३८ हजारांची रक्कम काढली. तिच्या भावाकडूनही चार लाखांची रक्कम उकळली. वारंवार मागणी करूनही चिटणीस पैसे परत करत नाही किंवा लग्नाचेही नाव काढत नसल्याने या भामट्याविरुद्ध तिने अखेर २८ सप्टेंबर २०१७ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.कोरे धनादेश घेऊन केली फसवणूकआपण ५५ वर्षीय असल्याचे भासवून शिवचंद्रने ठाण्यातील या महिलेकडून १७ कोरे धनादेश स्वाक्षरी करून घेतले. त्याने ते स्वाती राणे हिला वेगवेगळ्या खरेदीसाठी आणि लघुउद्योगासाठी दिले. या धनादेशांद्वारे त्याने ३ लाख ३८ हजार ६९ रुपयांची खरेदीही केली. तिच्या नातेवाइकांकडूनही प्रत्येकी ७० हजार असे १ लाख ४० हजार तसेच तिच्या भावाकडून ४ लाख रुपये घेतले. यातूनच त्याने पवई येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे घर खरेदीसाठी १८ लाख ७० हजार रुपये भरल्याची बनावट पावती तिला दाखविली.यापूर्वीचे गुन्हे पुण्याच्या पिंपरीतील विजय वराडे यांनाही इलेक्ट्रीक रिसर्च सेंटरचे टेंडर काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून चिटणीसने २ लाख रुपये घेतले होते. या प्रकरणीही १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.मुंबई, वाकोला येथील उज्ज्वला जगदाळे यांच्याकडून चिटणीस आणि स्वाती राणे यांनी खारघर येथे घर घेऊन देण्याच्या नावाखाली २६ लाख उकळले.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकthaneठाणे