शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त; ३५ हजार रुपये दंड वसूल

By नितीन पंडित | Updated: December 28, 2023 19:34 IST

मनपा प्रशासनाने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली.

 भिवंडी: पर्यावरणास घातक असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध असतानाही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईत ८०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्या किराणा दुकानदारांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मनपा प्रशासनाने गुरुवारी दिली आहे. महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. या स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक मुक्त भिवंडीचा संकल्प करण्यात आला आहे.गुरुवारी मनपा प्रशासनाने सिंगल यूज प्लास्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. शहरातील नजराना कंपाउंड,शिवाजीनगर,गुरुदेव फरसाण मार्ट, भिवंडी टॉकीज परिसर, तीनबत्ती बाजारपेठ, बॉम्बे फरसाण मार्ट या सर्व भागात पालिकेने विशेष मोहीम राबवली. यामध्ये एकूण ८०० किलो प्लास्टिक जप्त करून,ऋषभ प्लास्टिक, विनोद मगनलाल, गुरुदेव फरसाण मार्ट विक्रेते व इतरांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेत आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली,पश्चिम विभाग प्रभाग समिती ४ व ५ चे आरोग्य निरीक्षक हेमंत गूळवी,आरोग्य निरीक्षक शशी घाडगे,राजेंद्र घाडगे, प्रभाग समिती क्रमांक ४ व ५ मधील आरोग्य कर्मचारी पथकाने कारवाई केली. यापुढे सिंगल यूज प्लास्टिक, प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्रेते, व वापरणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे. सिंगल यूज प्लास्टिक वापर करताना तीन वेळा आढळल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि चौथ्या वेळेला नियमानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी