शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाप्रणीत संघटनेच्या बंदमुळे अत्यावश्यक सेवेतील सुमारे 800 कर्मचाऱ्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 16:51 IST

पालिकेने मात्र ठेकेदारास मे अखेरीस 94 लाख अदा केल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला आहे. 

मीरा रोड - मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बस ठेकेदारास पालिकेने पैसे दिले नाही म्हणून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, असा दावा करत भाजपाप्रणीत श्रमिक जनरल कामगार संघटनेने तडकाफडकी बंद केल्याने पालिका आणि अत्यावश्यक सेवेतील सुमारे 800 कर्मचाऱ्यांचे बसअभावी अतोनात हाल झाले. आज शनिवारी बस नसल्याने अनेक कर्मचारी येऊ शकले नाहीत. पालिकेने मात्र ठेकेदारास मे अखेरीस 94 लाख अदा केल्याचे सांगत कारवाईचा इशारा दिला आहे. 

मीरा-भाईंदर पालिकेने बससेवा चालवण्यासाठी 31 जुलै 2019 रोजी भागीरथी एमबीएमटी या ठेकेदार कंपनीची नियुक्ती केली असून. पालिका ठेकेदारास दरमहा एक कोटी वा जास्त रक्कम देते. कर्मचाऱ्यांच्या पगारापासून सर्व खर्च ठेकेदाराने करायचा आहे व ती त्याची जबाबदारी असल्याचे करारनामानुसार म्हटले जाते. मार्चपासून टाळेबंदी लागू झाल्याने बस सेवा बंदच असून, केवळ पालिका कर्मचारी, कंत्राटी सफाई, वैद्यकीय आदी आवश्यक सेवेतील कर्मचारी यांना त्यांच्या राहत्या घरापासून पालिका सेवेत आणण्यासाठी रोज सुमारे 38 बस सोडल्या जातात. सकाळी कामासाठी आणल्यानंतर सायंकाळी कामावरून पुन्हा घरी बसने सोडले जाते. 

दरम्यानच्या अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत बस कर्मचारी यांचा मे महिन्याचा पगार ठेकेदाराने दिलेला नाही. तर काम नसल्याने घरीच असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांना 22 मार्चपासून आजपर्यंतचा पगार देण्याची मागणी श्रमिक सह अन्य कामगार संघटनांनी चालवली आहे. गुरुवारी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या दालनात भाजपा प्रणित कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र मेहतांसह पालिका अधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी यांची बैठक झाली. बैठकीत पगाराबाबत निर्णय न झाल्याने काम बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनाने आणली असल्याचा आरोप करत शुक्रवारपासून तडकाफडकी बस बंद करण्यात आल्या. 

यामुळे सायंकाळी कामावरून पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यातील आपल्या घरी जाण्यास सुमारे 800 कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले. अनेकांना नाईलाजाने पदरचे पैसे खर्च करून मिळेल ती खाजगी वाहने करून घर गाठावे लागले. घरी जाण्यास रात्री उशीर झाला. काहींना तर शहरात मिळेल तिकडे थांबावे लागले. आज शनिवारी सकाळी देखील बस नसल्याने अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर येऊ शकले नाहीत असे पालिका सूत्रांनी सांगितले. दरम्यान उपायुक्त अजित मुठे यांच्या दालनात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीनंतर ठेकेदारास पत्र देण्यात आले. मुठे यांनी दिलेल्या पत्रानुसार, पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असून 30 मे रोजीच त्याला 94 लाख रुपये पालिकेने दिले आहेत. आणि नवीन देयक देखील ठेकेदाराने गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास पालिकेने दिले . करारा प्रमाणे अत्यावश्यक बससेवा सुरळीत  ठेवणे आणि कर्मचारी यांचे पगार देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याने कारवाई करू, असा इशारा ठेकेदारास दिला आहे. परिवहन सेवा चालवण्यास देण्याच्या ठेक्यात मोठा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप आधी देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी केला होता. त्यातच पालिकेने मे अखेर 94 लाख ठेकेदारास दिले असताना व कामावर नसलेल्यांच्या पगाराची जबाबदारी ठेकेदाराची असताना मेहता यांच्या भाजपा प्रणित कर्मचारी संघटनेने मात्र पालिका प्रशासनावर अचानक केलेल्या कामबंद चे खापर फोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयुक्त चंद्रकांत डांगे व मेहता यांच्यातील वाद की ठेकेदाराशी लागेबांधे ? या मागे असल्याची देखील चर्चा आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे हाल होऊन वैद्यकीय आदी सेवांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.