शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या नया नगर मधील ८० हातगाड्या पालिकेने तोडल्या 

By धीरज परब | Updated: March 7, 2023 19:17 IST

मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या नया नगर मधील बेकायदा फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या सोमवारी महापालिकेने जेसीबीने मोडून काढल्या . यावेळी काही महिलांनी पालिकेच्या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. 

नया नगर मधील  बाणेगर शाळा मार्गवर बेकायदा फेरीवाल्यांचा उच्छाद मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत . ह्या फेरीवाल्यांच्या गुंडां कडून तक्रारी करणाऱ्या रहिवाश्याना धमकावण्यासारखे प्रकार घडले आहेत . तर पालिकेच्या पथकास सुद्धा ह्या फेरीवाल्यांची दांडगाई सहन करावी लागते . 

सोमवारी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशा नंतर उपायुक्त मारूती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली . अतिक्रमण विभाग प्रमुख  नरेंद्र चव्हाण ,  प्रभाग अधिकारी   योगेश गुनिजन , कनिष्ठ अभियंता सुदर्शन काळे , फेरीवाला पथक प्रमुख सचिन साळुंके, मुरली

पाटील, भैरू नाईक,  लिपिक महेश गावंड ,  पोलिस निरीक्षक माणिक पाटील सह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान , मजूर यांच्या पथकाने फेरीवाल्यांच्या ८० हातगाड्या जप्त केल्या . नंतर जेसीबीने त्या हातगाड्या मोडून काढण्यात आल्या . या आधी देखील पालिकेने येथील हातगाड्यांवर अशी कारवाई केली आहे . तरी बक्कळ धंदा असल्याने फेरीवाले व त्यांच्या मागील माफिया हे पुन्हा गाड्या लावून रस्ते बळकावतात . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक