शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटींचे धनादेश वटले नाहीत : ७० जणांविरोधात होणार कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:04 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस मालमत्ताकरापोटी दिलेले एकूण आठ कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने करवसुली विभागाने ७० जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेस मालमत्ताकरापोटी दिलेले एकूण आठ कोटी रुपयांचे धनादेश न वटल्याने करवसुली विभागाने ७० जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धनादेश न वटल्याने महापालिकेचे नुकसान झाले आहे. तसेच अशा प्रकारचे धनादेश देत मालमत्ताधारकांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे महापालिकेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय झाला आहे.महापालिका दरवर्षी मालमत्ताकर आणि पाणीबिलाच्या वसुलीसाठी मोहीम राबवते. ३१ मार्च २०१९ अखेर महापालिकेने ६३२ कोटी ८३ लाख रुपये वसुली केली होती. महापालिकेने करवसुलीचे लक्ष्य ३५० कोटी रुपये आखून घेतले होते. त्यापेक्षा जास्त वसुली झाली. मात्र, ज्या मालमत्ताधारकांकडे मालमत्ताकराची थकबाकी होती त्यांना महापालिकेने नोटीस पाठविली होती. थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करून मालमत्तेचा लिलाव केला जाईल, असे नोटिशीत म्हटले होते. त्यामुळे अनेकांनी थकबाकीच्या रक्कमेचे धनादेश करवसुली विभागाकडे दिले होते. मात्र, अनेक थकबाकीधारकांचे धनादेश न वटल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याची नोटीस प्रशासनाने बजावली. त्यामुळे काही थकबाकीदारांनी रक्कम जमा केली. तर, काहींनी नोटिशीला उत्तरही दिले नाही. परिणामी महापालिकेने न वटलेल्या जवळपास आठ कोटी रुपयांच्या धनादेशापोटी ७० जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. धनादेश न वटल्याने महापालिकेची फसवणूक आणि आर्थिक नुकसान झाले आहे. न्यायालयात दावे दाखल करण्यासाठी एकूण न वटलेल्या धनादेशाच्या रक्कमेपैकी दोन टक्के म्हणजे १६ लाख रुपये मुद्रांक शुल्क न्यायालयात भरावे लागणार आहे. त्याशिवाय कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करता येणार नाही. करविभागाचे प्रमुख विनय कुलकर्णी यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांकडे मुद्रांक शुल्क भरण्याची परवानगी मागितली आहे. मात्र, १६ लाख रुपयाची रक्कम महापालिकेनेच्या निधीतून का भरावी, असा सवाल केला जात आहे. तसेच ही रक्कम भरण्यास लेखा व वित्त अधिकारी अनुमती देतील का, याविषयी अद्याप सुस्पष्टता नाही.मागील वर्षीही नोंदवला आक्षेपमार्च २०१८ अखेर महापालिकेच्या करवसुलीच्या वेळी थकबाकीदारांनी जमा केलेल्या रक्कमेपैकी १९ कोटी रुपयांचे धनादेश वटलेले नव्हते.न वटलेले धनादेशही प्रशासनाने वसुलीच्या रक्कमेत धरले होते. त्याविषयी मुख्य लेखा व वित्त अधिकारी का. बा. गर्जे यांनी आक्षेप नोंदविला होता.स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल दामले यांनी या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करत करविभागास जाब विचारला होता. त्यानंतर धानदेश न वटल्याने ते देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईस चालना मिळाली होती.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका