शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ७५ खासगी रुग्णालयांना मिळू लागला पुरेसा ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:10 IST

 ठाणे  शहरात सध्याच्या घडीला १४ हजार ५४२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ६१३ रुग्ण हे गंभीर असून, ४४२ आयसीयुमध्ये, तर १७१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरला आता येत्या दोन दिवसांत ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याने तेथील ऑक्सिजनचे बेड पुन्हा सुरू केले जाणार आहेत. तर दुसरीकडे आता शहरातील खासगी कोविड आणि नॉनकोविड अशा ७५ रुग्णालयांनादेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे पुरेसा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. तूर्तास ऑक्सिजनचे संकट टळले असले, तरीदेखील अतिरिक्त साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली जात आहे.         ठाणे  शहरात सध्याच्या घडीला १४ हजार ५४२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. यातील ६१३ रुग्ण हे गंभीर असून, ४४२ आयसीयुमध्ये, तर १७१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात आजघडीला २५० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खासगी कोविड रुग्णालये आहेत, तर ५० नॉनकोविड रुग्णालयातदेखील कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खासगी रुग्णालयांना सध्या ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. 

‘पार्किंग प्लाझा’ला लवकरच ३५० ऑक्सिजनचे बेडशहरातील ७५ खासगी रुग्णालयांना रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. पालकमंत्री आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांची ऑक्सिजनची समस्या तूर्तास मार्गी लावली आहे. अतिरिक्त साठा मिळत नसला, तरीदेखील पुरेसा साठा या रुग्णालयांना मिळू लागला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे ठाणे  अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी दिली. 

रुग्णसंख्या वाढत असल्याने जास्तीचा ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे वाढीव साठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पालिकेने ऑक्सिजनचे दोन प्लाॅन्ट उभारण्याचे काम हाती घेतले असून, दोन ते तीन दिवसांत पार्किंग प्लाझा येथील ३५० ऑक्सिजनचे बेड सुरू करण्यात येणार आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनcorona virusकोरोना वायरस बातम्या