शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतींसाठी आजपर्यंत ७५ उमेदवारी अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 21:09 IST

Gram panchayat Election : जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे  : जिल्ह्यातील १५८ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. आजच्या दिवशी ६७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. यास आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींसाठी इच्छूक उमेदवारांनी ७५ अर्ज आँनलाइन दाखल केले आहेत. या इच्छुकांना ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

  जिल्ह्यात ४३१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या या १५८ ग्राम पंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील या ग्राम पंचायतींच्या एक हजार ३८१ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. यासाठी ६११ मतदान केंद्र निश्चित केलेले असून त्यावर तीन लाख चार हजार ९६० मतदारांच्या  मतदानाचे नियोजन केलेले आहे. त्यास अनुसरुन गुरुवारपर्यंत ७५ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. यापैकी कल्याण १२ अर्ज, अंबरनाथला नऊ, मुरबाडला दोन, भिवंडीला ३१ आणि शहापूरला २१ उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले आहेत. या उमेदवारी अर्जांची ३१ डिसेंबररोजी छाननी असून ४ जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक