शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कोरोना रुग्णांसाठी आणखी ७५ खाटा; रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते झाले लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 04:18 IST

श्रीकांत  शिंदे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एप्रिलपासून महापालिकेचे आयुक्त व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जम्बो सेटअप उभारण्यास सुरुवात केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी डोंबिवली क्रीडासंकुलातील टेनिस कोर्टच्या लॉनवर उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण शुक्रवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी आणखी ७५ खाटा उपलब्ध होणार आहेत.रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, डॉ. प्रतिभा पानपाटील, वन रुपी क्लिनिक्सचे राहुल घुले, नगरसेवक राजेश मोरे, शैलेश धात्रक, विश्वनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.श्रीकांत  शिंदे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एप्रिलपासून महापालिकेचे आयुक्त व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जम्बो सेटअप उभारण्यास सुरुवात केली. त्या वेळी रुग्ण कमी असताना इतकी मोठी यंत्रणा उभी करण्याची गरज काय, असा सवाल काही मंडळी उपस्थित करत होती. गणेशोत्सवात नागरिकांचा संपर्क वाढल्याने सध्या पुन्हा रुग्ण वाढत आहेत. अनलॉकमध्ये अनेक व्यवसायांना मुभा दिली आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असताना जम्बो सेटअप हाच उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे.’चव्हाण म्हणाले, ‘महापालिकेने जम्बो सेटअप अंतर्गत चांगल्या आरोग्य सुविधा उभारल्या आहेत. मात्र, खाजगी रुग्णालयांत कोविड रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. त्यावरही महापालिकेचे चांगल्या प्रकारे नियंत्रण असावे. तसेच कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी महापालिकेने खाटा राखीव ठेवाव्यात.’ दरम्यान, या मागणीस खासदारांनी होकार दिला आहे. तर, प्रशासनानेही मान्य केले आहे.‘चाचण्यांचे प्रमाण वाढवणार’- सूर्यवंशी यांनी सांगितले, मार्चपासून महापालिकेची यंत्रणा काम करत असल्याने हे जम्बो सेटअप, कोविड रुग्णालये उभारणे शक्य झाले आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत आपल्या महापालिका हद्दीत कोविड चाचण्यांचा दर सगळ्यात जास्त आहे. चाचण्या आणखी वाढवल्या जाणार आहेत.- कोरोनाचे लवकर निदान झाले तर त्यावर त्वरित उपचार करून रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोनाचा मृत्युदर हा दोन टक्केच्या आत आहे. तर, उपचाराअंती बरे झालेल्यांची टक्केवारी आजमितीस ८५ टक्के आहे.- चाचण्या वाढवत असताना रुग्णसंख्या वाढत आहे. येत्या काळात दिवसाला ९०० रुग्णही पॉझिटिव्ह आले तरी त्यांच्या उपचारासाठी ९०० खाटांची व्यवस्था सज्ज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली