शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिक्षकांकडून ७ वर्षाच्या मुलीचा विनयभंग, शिक्षक गजाआड

By सदानंद नाईक | Updated: September 13, 2024 18:52 IST

न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहर पूर्वेतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकाने ७ वर्षाच्या मुलीचा शाळेच्या हद्दीत विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी गुरवारी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शिक्षकाला अटक करण्यात आली. न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उल्हासनगर पूर्वेतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली कक्षात ७ वर्षाची मुलगी शिक्षण घेते. बदलापूर घटनेने सतर्क झालेल्या एका मुलीच्या पालकाने गणेशोत्सवाच्या सुट्टीत मुलीला बोलते केले असता, शिक्षक चुकीच्या ठिकाणी स्पर्श करीत असल्याचे मुलीने सांगितले. या प्रकाराने पालकांना धक्का बसला असून त्यांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी गुरवारी हिललाईन पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विनयभंग व पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच शिक्षकाला अटक केली. न्यायालयाने शिक्षकाला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनाविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. तसेच हा प्रकार ६ सप्टेंबर पूर्वी म्हणजे गणेशोत्सव सुट्टीपूर्वी झाला आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत असल्याची माहिती पोलीस अधिकारी जगताप यांनी दिली. दरम्यान शाळांना गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने शाळा प्रशासनासी संपर्क झाला नाही.

 बदलापूर-अंबरनाथनंतर उल्हासनगर?

बदलापूर शाळेतील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर व अंबरनाथ मध्ये अत्याचाऱ्याच्या अनेक घटना लागोपाठ घडल्या. त्यानंतर उल्हासनगरात महिला पत्रकारावर अत्याचार झाल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही, तोच ७ वर्षाच्या मुलीचा शिक्षकांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी