शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 05:28 IST

नायगाव पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍याकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती नायगावमधील एका शाळेत घडल्याचे उघडकीस आले आहे. या शाळेच्या उपहागृहात काम करणार्‍या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.

पीडित मुलगी या शाळेत दुसर्‍या इयत्तेत शिकते. २२ ऑगस्टला ती शाळेतील कॅंटीनमध्ये जाण्यास तयार नव्हती. कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानतंर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली तेव्हा मागील १५ दिवसांमध्ये शाळेच्या कॅंटीनमध्ये काम करणारा १६ वर्षीय तरुणाने शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत ४ ते ५ वेळा हात पकडून कॅंटीनमध्ये खेचून अश्लील चाळे करून घाणेरडे हावभाव करत लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.

एकदा पीडित मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती. परंतु त्यांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नव्हते. मुख्याध्यापकांनी त्वरीत याबाबतची माहिती शुक्रवारी नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेnalasopara-acनालासोपारा