शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

७ हजार कामगारांना दिवाळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:08 IST

दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या.

ठाणे : दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, सहाव्या वेतन आयोगातील त्रुुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, विविध भत्ते लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. परिवहनसेवेच्या ६१३ कर्मचाºयांना एक महिन्यात नियमित करण्याचा निर्णयही घेतला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींचा बोजा पडणार आहे.आयुक्तांनी शुक्रवारी संयुक्त बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे २०६ कुशल आणि १५४६ अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील २३२ कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनि:सारण विभाग या ठिकाणी काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१५ ते ३१ आॅक्टोबर २०१६ या कालावधीतील किमान वेतन कायद्यानुसार मिळणारी फरकाची रक्कम पाच हप्त्यांत देण्याचा निर्णय घेतला. पहिला हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचाºयांनाही सरळसेवा नियुक्तीप्रमाणे देय असलेल्या पगाराच्या ६० टक्के किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे जास्त असेल, ते वेतन देण्याचा निर्णय घेतला.स्थायी कर्मचाºयांच्या ग्रेड पेमधील त्रुटी दूर करून सुधारित नियमानुसार वेतन निश्चित करण्यात येणार आहे. याचा जवळपास सातहजार कर्मचाºयांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्या वेतनत्रुटी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक पदांची वेतनश्रेणी राज्य शासनाच्या धर्तीवर सुधारित करणार, तसेच आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला. अग्निशमन दलातील कर्मचाºयांना त्यांची जबाबदारी विचारात घेऊन उच्च वेतनश्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.‘अस्थायीं’ना दिलासाकर्मचाºयांना विशेष पूरकभत्ता, वैद्यकीयभत्ता, वाहतूकभत्ता, अपंग महिला कर्मचारी विशेष भत्ता, देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ठाणे परिवहनसेवेतील ६१३ अस्थायी कर्मचाºयांना एका महिन्यात नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाDiwaliदिवाळी