शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात बदली झालेल्या ७ पोलीस अधिकाऱ्यांची मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात घर वापसी

By धीरज परब | Updated: January 1, 2025 12:43 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकाऱ्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या झाल्या होत्या.

मीरारोड - विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता काळात मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ अधिकाऱ्यांच्या ३० ऑक्टोबर रोजी बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी आता ७ अधिकाऱ्यांची पुन्हा आयुक्तालयात नियुक्ती केली गेली आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात ३ वर्षां पेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश केंद्रीय निवडणुक आयोगाने ३१ जुलै आणि २८ सप्टेंबर २०२४ रोजी दिले होते.  १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता सुरु झाल्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने बदलीस पात्र पोलीस अधिकाऱ्यांची यादी पोलीस महासंचालकांना सादर केली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या केल्या गेल्या होत्या. बदल्या केल्याने अनेक अधिकारी नाराज होते. 

 नोव्हेंबर रोजी मुंबई व अन्य भागातील ३६ अधिकाऱ्यांची नियुक्ती पोलीस आयुक्तालयात केली गेली होती. उपायुक्त मुख्यालय यांच्या आदेशात नव्याने हजर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी तुळींज वगळता एकही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक वा प्रभारी म्हणून नियुक्तीच केली गेली नव्हती.  सदर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या तात्पुरत्या असल्याचे नमूद केले होते. 

त्यामुळे नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणुकीनंतर पुन्हा अंतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. लोकमतने देखील तसे वृत्त दिले होते. आयुक्तालयातून मुंबई आदी भागात बदली झालेल्या पैकी काही पोलीस निरीक्षकांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. शिवाय काही अधिकाऱ्यांनी आपणास पुन्हा मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयात नियुक्ती करावी असे विनंती अर्ज देखील केले होते. 

अखेर ३१ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाने ४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यात मीरा भाईंदर - वसई विरार आयुक्तालयातून मुंबईत बदली झालेले संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी ह्या ७ पोलीस निरीक्षकांची पुन्हा बदली करून घर वापसी केली गेली आहे. 

पुन्हा आयुक्तालयात घर वापसी झाल्याने हे अधिकारी खुश झाले असून त्यांना पुन्हा आधी कार्यरत असलेली पोलीस ठाणी मिळतील अशी शक्यता आहे. त्यातही बदली होऊन पुन्हा आलेल्या पोलीस निरीक्षकांना त्यांच्या वरिष्ठते नुसार त्या त्या पोलीस ठाण्यात नेमल्यास सध्या प्रभारी पद सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याच पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक यांच्या हाताखाली काम करावे लागण्याची पाळी येण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Policeपोलिस