शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65; तर 10 नगर परिषद, नगरपंचायतींसाठी 73 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 21:15 IST

मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21च्या पोटनिवडणुकीसाठी 29 टक्के मतदान झाले असून इतर विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठी देखील शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी मतदान झाले; तसेच त्याअंतर्गतच्या शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठीही मतदान झाले. शेलार निवडणूक विभागातील मतदान केंद्र क्र. 38/6 वर फेरमतदान घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे शेलार निवडणूक विभाग; तसेच शेलार निर्वाचक गण आणि कोलीवली निर्वाचक गणाची मतमोजणी पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत.वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्तपदासोबतच चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 14) मतमोजणी होईल.नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदानविविध जिल्ह्यांमधील 6 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आणि अध्यक्षपदासाठी; तसेच पाच नगरपरिषदा व एका नगरपंचायतीतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले, असेही सहारिया यांनी सांगितले.नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान असे: हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18, नंदुरबार- 70.93, नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34, किनवट (जि. नांदेड)- 77, चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85, पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56, वाडा (जि. पालघर)- 72.79, शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59, फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 आणि सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65. सरासरी- 72.81.नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83, शहादा (जि. नंदुरबार)- 63.50, अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61, जिंतूर (जि. परभणी)- 64.42, मंगरूळपीर (जि. वाशीम)- 58.62 आणि एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37. वाडा नगरपंचायत व नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषदेची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे. अन्य सर्व ठिकाणीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी उद्या (ता. 14) होईल.मुंबईत एका जागेसाठी मतदानबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 29 टक्के मतदान झाले. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे एकूण 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :Electionनिवडणूक