शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीएफ कार्यालयाची ६.५० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:26 IST

कामगारांचे पैसे त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून भलत्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करणा-या भिवंडीच्या माजी नगरसेविका दीपाली भोई यांच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे : कामगारांचे पैसे त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून भलत्याच व्यक्तीच्या खात्यामध्ये जमा करणा-या भिवंडीच्या माजी नगरसेविका दीपाली भोई यांच्यासह तिघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये ३० ते ३५ कामगारांची सहा लाख ४७ हजार ५५२ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुरबाड एमआयडीसीतील विद्यावासिनी स्टील प्रॉडक्ट्स प्रा. लिमिटेड आणि पालघरच्या वाडा तालुक्यातील कुडूस येथील मेसर्स कुडूस स्टील रोलिंग मिल्स प्रायव्हेट या दोन कंपन्यांमधील मूळ भविष्य निर्वाह निधी सदस्यांची ठाण्याच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा झालेली सहा लाख ४७ हजार ५५२ इतकी रक्कम प्राधिकृत अधिकारी आणि इतर बँक खातेधारक यांनी आपसात संगनमत करून ती अन्य बँक खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. प्राधिकृत अधिकारी फिरोज सिद्दीकी (रा. राबोडी, ठाणे), भिवंडी-निजामपुरा महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका भोई आणि स्टील रोलिंग मिल्स कंपनीचे गंगाराम अग्रवाल यांना या कामगारांची बँक खाती तसेच इतर माहिती होती. त्यांच्याच माहितीने हे पैसे वळते झाले असल्यामुळे प्रथमदर्शनी त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. २००९ ते २०१६ या काळात सुमारे साडेसहा लाखांची रक्कम अन्य व्यक्तीच्या बँक खात्यात वळती झाली आहे.तपास करणार-ठाण्याच्या पीएफ विभागाचे अधिकारी मोहंमद खान यांनी २७ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.एकाचे पैसे दुसºयाच्या खात्यावर कशामुळे जमा झाले, याचा तपास करू असे पो.नि. अनघा देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे