शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

६२ हजारांचे वीजबिल अखेर २०३ रुपये

By admin | Updated: June 25, 2017 03:59 IST

‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी इंदिरानगर झोपडपट्टीतील राजू शिर्के यांना ‘महावितरण’ने ६२ हजार रुपयांचे बील पाठवल्याबद्दल जाब विचारण्यात आला. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेत चौकशी केली. अखेर हे बील २०३ रुपये केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली.वाढीव बिलांप्रश्नी घेराव घातल्यानंतर शिर्के यांचे बील काही तासांतच ६२ हजारांवरून थेट २०३ इतके कमी करण्यात आले. हे कसे शक्य झाले, असा सवाल कांबळे यांनी केला. भाजपाच्या आंदोलनामुळे शिर्के यांना दिलासा मिळाला असला तरी असा सावळा गोंधळ किती जणांच्या बाबतीत असेल? ‘महावितरण’च्या हलगर्जीमुळे अनेकांना सदोष बिले जात असतील. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच होत असेल. किती वेळा आंदोलन करायची आणि का? त्यातून काही निष्पन्न होणार आहे की नाही. सातत्याने अशा चुका का केल्या जातात? की त्या जाणुनबुजून केल्या जातात, असे सवालही त्यांनी विचारले.वाढीव बिले आलेल्या वीजग्राहकांनी ठिकठिकाणी भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटावे, असे आवाहन कांबळे यांनी केले. जिल्ह्यातील भाजपाच्या नगरसेवकांनी नागरिकांना सहकार्य करावे, ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. ज्यांना न्याय मिळेल त्यांना मिळेल. भाजपा नागरिकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.