शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६०६ विस्थापितांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:48 IST

लाॅटरी पद्धतीने वाटप : शीळ येथे बीएसयूपीच्या घरांमध्ये मिळाला निवारा 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : २०१६ सालापासून रेंटलच्या घरांत वास्तव्यास असलेल्या शहरातील तब्बल ६०६ विस्थापितांना अखेर हक्काची घरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील ब्रह्मांड, कासारवडवली आणि पडलेगाव, दिवा-शीळ येथे बीएसयूपीच्या माध्यमातून उभारलेल्या घरांमध्ये त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यामध्ये कळव्यातील बुधाजीनगर येथील ८५ रहिवाशांचादेखील समावेश आहे. लॉटरी पद्धतीने ही घरे दिल्याची माहिती महापालिकेने दिली. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शनिवारी ही लॉटरी काढण्यात आली.

२०१६ सालापासून शहरातील घोडबंदर, जोगिला तलाव परिसर, कळव्यातील शास्त्रीनगर, बुधाजीनगर, लोकमान्यनगर भागातील शास्त्रीनगर ते हत्तीपूल आदी भागांतील रहिवाशांची रस्ते रुंदीकरणात घरे गेली होती. या सर्व रहिवाशांना पालिकेने रेंटलच्या घरात वास्तव्यास ठेवले होते. परंतु, अखेर या ६०६ रहिवाशांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न शनिवारी संपुष्टात आला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात या रहिवाशांना लॉटरी पद्धतीने हक्काच्या घरांचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आदींसह पालिकेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे अनेक रहिवासी विस्थापित झाले होते. 

आठ दिवसांत मिळणार गृहप्रवेशया रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढली असून यामध्ये त्यांना इमारत, त्यांचा फ्लॅट क्रमांक दिला आहे. त्यानंतर, आता पुढील आठ दिवसांत त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांत जाता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर, पहिल्या टप्प्यानंतर आता शिल्लक २०२ घरेही दुसऱ्या टप्प्यात लवकरच वितरित केली जाणार आहेत.

मुकुंद केणी यांचे प्रयत्न अखेर सफलठाणे : कळव्यात १६ फेब्रुवारी २०१६ रोजी स्टेशन ते टीएमटी परिवहन नवीन रस्ता प्रकल्प करताना बुधाजीनगर येथील ८५ रहिवाशांच्या घरांवर बुलडोझर फिरविला होता. त्यानंतर येथील रहिवाशांना खोपट येथील रेंटलच्या घरात हलविले होते. त्यांना हक्काची घरे मिळावीत यासाठी कै. मुकुंद केणी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शर्तीचे प्रयत्न केले होते. अखेर आज ते हयात नसतानाही त्यांचे प्रयत्न मात्र सार्थकी लागल्याचे दिसून आले.