शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु, तीन महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 15:56 IST

किसनगर भागातील विजय निवास इमारतीच्या तिसऱ्या  मजल्याचा स्लॅब कोसळुन झालेल्या दुर्देवी घटनेत एका ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला असून, तीन महिला जखमी झाल्या आहेत.

ठळक मुद्देधोकादायक इमारतीच्या यादीत होता समावेशतळ अधिक पाच मजल्याची इमारत२० वर्षे जुनी इमारत

ठाणे - किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिसऱ्या  मजल्यावरील स्लॅब दुसऱ्या  मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका ६० वर्षीय वृध्दाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. तर या घटनेत तीन महिला देखील जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु या घटनेमुळे किसनगर भागातील इमारती पुन्हा रडावर आल्या आहेत.रात्री १२.३० च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व अग्निशमन दलाचे पथक, २ अ‍ॅम्ब्युलन्स, घटनास्थळी दाखल झाल्या. तळ अधिक पाच मजल्याच्या या इमारतीच्या तिसऱ्या  मजल्यावरील हॉल मधला स्लॅब हा दुसऱ्या  मजल्यावर पडल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यानी सांगितले आहे. त्यामुळे या दुर्देवी घटनेत दुसऱ्या  मजल्यावरील बबलू घोष (६०) यांचा जागीच मृत्यु झाला. तसेच बानी बबलू घोष (५६) या देखील जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यामुळे त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर नयना पाठारे (५९) यांच्यासह यास्मीन रजनीकांत पठारे (२२) या देखील किरकोळ जख्मी झाल्या आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान ही इमारत २० वर्षे जुनी असून ती धोकादायक इमारतींच्या यादीत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये ३८ कुटुंबांचे वास्तव्य असून घटना घडल्यानंतर काहींनी बाजूच्या इमारतीचा आसरा घेतला आहे. तर पालिकेने देखील येथील रहिवाशांना हलविले आहे. या इमारतीत ओव्हरलोड झाल्यानेच हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. त्यानुसार ही इमारत वापरण्यास योग्य आहे अथवा नाही, याची माहिती घेण्यासाठी पालिकेची स्ट्रक्चरल आॅडीटची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून या इमारतीचा सर्व्हे सुरु झाला आहे. या आॅडीटचा अहवाल दोन दिवसात पालिकेला प्राप्त होणार असून त्यानंतर या इमारतीचे भवितव्य ठरविले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु या दुर्देवी घटनेनंतर किसनगर हा परिसर पुन्हा एकदा रडारवर आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त