शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

त्या स्मशानभुमीतील १२ कामगारांचा जीव टांगणीला, पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:55 IST

लोकमान्य नगर भागातील मृत पावलेला तो नागरीक आता स्मशानभुमीतील कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आता या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आमचीसुध्दा तपासणी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ठाणे : लोकमान्य नगर भागातील रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. मृत्यु नंतर या रुग्णावर वागळे इस्टेट भागातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु आता या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती येथील कामगारांना मिळाल्यावर आता त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आलटून पालटून एकच हॅन्डग्लोज वापरावा लागत आहे. सॅनिटायझरची सुविधा नाही, किंवा इतर कोणत्याही सुविधा नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यात येथील आम्ही जवळ जवळ सर्वच जण त्या नागरीकाच्या संपर्कात आलो आहोत, त्यामुळे आता आमची तपासणी होणार का नाही, अशी काळजी त्यांना सतावू लागली आहे.                 लोकमान्य नगर भागातील एकाचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याची घटना त्याच्या मृत्यु नंतर समोर आली आहे. त्या नुसार त्याच्या अंत्ययात्रेत, दर्शनासाठी आलेल्या ५५ नागरीकांना पालिकेने विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. परंतु आता ज्या वागळे इस्टेट स्मशानभुमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, तेथील कर्मचारी वर्ग आता भितीच्या सावटाखाली आला आहे. या स्मशानभुमीत जवळ जवळ १२ कर्मचारी कामाला आहेत, एकच हॅन्डग्लोज त्यांना आलटून पालटून वापरावा लागत आहे. सॅनिटायझरची सोय नाही, इतर सुविधांची देखील वाणवा आहे. असे असतांना त्या रुग्णाचा मृतदेह देखील याच स्मशानभुमीत आणण्यात आला होता. पंरतु आम्हाला त्याची कल्पना नव्हती. नागरीकांनी देखील आम्हाला याची माहिती दिली नाही. आता आम्ही वृत्तपत्र, सोशल मिडियावर वाचले तेव्हा आमच्या लक्षात आले की आम्ही जो मृतदेह जाळला त्याला कोरोनाची लागण झाली होती. आधीच आम्हाला सुविधांची वाणवा आहे आता त्यात या निमित्ताने आणखीन भर पडली आहे. त्यात त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेने विलगीकरण कक्षात नेले आहे, परंतु आता आमचे काय असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या