शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्राचा १४ कोटींचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 01:16 IST

मीरा-भार्इंदर, भिवंडीला अनुदान : शहर स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील ९ शहरांचे १७२ कोटी ५१ लाख ९९ हजार ४४९ रुपयांचे प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाने केंद्राकडे पाठविले असून त्यापैकी केंद्राने आपल्या अनुज्ञय हिश्श्याचे ५८ कोटी ४९ लाख ९०७ रुपयांपैकी पहिल्या हप्ता म्हणून २९ कोटी २४ लाख ५० हजार ४५३ रुपयांचा निधी नुकताच वितरीत केला आहे. यातील ठाणे जिल्ह्यातील मीरा-भार्इंदर आणि भिवंडी महापालिकेच्या वाट्याला १४ कोटी सात लाख ४८ हजार २८ रुपये आले आहेत. उर्वरित सहा शहरांमध्ये अहमदनगर, अकोला या दोन महापालिकांसह बारामती, कळंब, जत आणि श्रीवर्धन या चार नगरपालिकांचा समावेश आहे.

केंद्राकडून मिळालेल्या या निधीतून उपरोक्त ९ शहरांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाना आपला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून आपले शहर स्वच्छ ठेवायचे आहे. देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करून नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व शहरांना स्वच्छतेची सवय लागून या शहरामधील नागरिकांना घरगुती शौचालयांची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्राने ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ सुरू केले आहे. त्याआधारावर ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान ’ राबवण्यात येत आहे.मीरा-भार्इंदरला आठ कोटीमीरा-भार्इंदरचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ४५ कोटी ६८ लाख ३० हजार ६६३ रुपयांचा असून त्यात केंद्राकडून १५ कोटी ९८ लाख ९० हजार ७३२ रुपये अनुदान मिळणार असून आता त्यातील सात कोटी ९९ लाख ४५ हजार ३६६ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.भिवंडीला सहा कोटी आठ लाखभिवंडी शहराचा प्रकल्पाची किंमत ३४ कोटी ७४ लाख ४३ हजार ७८४ रुपये असून त्यात केंद्राकडून मिळणारा अनुज्ञय हिस्सा १२ कोटी १६ लाख पाच हजार ३२४ रुपये असून आता त्यापैकी सहा कोटी आठ लाख दोन हजार ६६२ रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका