शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ठाण्यातील आठ आगारातून ५९३ एसटी कर्मचारी हजर; ३१ बस धावल्या रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 17:17 IST

ST employees : ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे मिळून तीन हजार ०४१ इतके कर्मचारी पटलावर असून त्यापैकी १४९ कर्मचारी अधिकृतरित्या रजेवर आहेत.

ठाणे  :  मागील १२ ते १५ दिवसापासून विलीनीकरणाच्या मुद्यावरुन आंदोलनाचे हत्यार एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले होते. परंतु या कर्मचाऱ्यांच्या संपावर पगार वाढीचा तोडगा काढण्यात आल्यानंतरही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे दिसून आले आहे. ठाण्यातही ३ हजारपैकी ५९३ कर्मचारी शनिवारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आठ आगारातून ३१ बसेस या विविध मार्गावर सोडण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्यावतीने देण्यात आली.

राज्यभरासह ठाणे  जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून रान उठले आहे. त्यानुसार मागील १२ ते १५ दिवसापासून जिल्ह्यातील आठही आगारातून एकही बस रस्तावर धावली नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान एसटीचे झाले आहे. अशातच या आंदोलनाची दखल घेत, राज्य शासनाने देखील पगारवाढ करीत तोडगा काढला. परंतु शासनाने विलीनीकरणाच्या मुद्या मार्गी लावला नाही. तर पगारवाढ देत असल्याचे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील शासनाकडून करण्यात आली. मात्र, असे असले तरी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यात आता, परिवहन विभागाकडून देखील संप मागे घेवून कर्मचारी कामावर हजर न झाल्यास कडक पावले उचाण्यात येतील असा इशारा देखील देण्यात आला आहे. 

आजही राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून आले. परंतु दुसरीकडे संपातून माघार घेत, कामावर रुजू होणे पसंत केले असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता या संपात फुट पडल्याचेही दिसू लागले आहे. ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे मिळून तीन हजार ०४१ इतके कर्मचारी पटलावर असून त्यापैकी १४९ कर्मचारी अधिकृतरित्या रजेवर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संपात दोन हजार ७३२ इतके कर्मचारी हजर होते. त्यापैकी केवळ ५९३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून आजही एक हजार ९९० कमर्चारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात या आवाहनाला कर्मचाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाले असल्याचे दिसून येत आहे. 

असे असले तरी संपातून कर्तव्यावर हजर झालेल्या चालक वाहकांच्या मदतीने जिल्ह्यातील ठाणे १, ठाणे २, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, विठ्ठलवाडी आणि वाडा या आठ डेपोमधून ३१ बसेस सोडण्यात आल्या. यामध्ये ठाणे १ येथील ठाणे ते स्वारगेट या मार्गावर ५ शिवनेरी बसेस सोडण्यात आल्या तर, ठाणे ते बोरीवली यामार्गावर सध्या १२  बसेस सोडण्यात आल्या. तसेच ठाणे २ येथून ३ सध्या बसेस ठाणे – बोरीवली मार्गावर सोडण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी दिली. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपthaneठाणे