शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील ५८ लाख परतफेड प्रकरण; श्रमजीवी संघटनेचे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन

By नितीन पंडित | Updated: November 16, 2022 17:05 IST

मयत महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला हडप करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आंदोलन

भिवंडी- मुंबई वडोदरा महामार्गामध्ये बाधित शेतजमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी मयत आदिवासी कातकरी महिला ठकी सवर हिच्या जागी दुसऱ्या कातकरी वृद्ध महिलेस उभे करून शासनाची फसवणूक करून संगनमताने ५८ लाख ४२ हजार ९९६ रुपये आदिवासी कातकरी वृद्ध महिलेस उभे करून लाटणाऱ्या जमीन दलाल, शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा तात्काळ दाखल करावा, या मागणीसाठी बुधवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करीत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,प्रमोद पवार,तालुकाध्यक्ष सुनील लोणे, जया पारधी,संगीता भोमटे,आशा भोईर,जयेंद्र गावित,मुकेश भांगरे आदींच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भागीरथी मुकणे या अशिक्षित वयोवृद्ध आदिवासी महिलेला उभे करून हे पैसे लाटण्यात आले त्या भागीरथी मुकणे हिचे दारिद्र्य लाखो रुपये मिळून ही तसेच असताना फसवणुकीचा भांडाफोड झाल्या नंतर या अशिक्षित महिलेच्या वतीने शासनाच्या बँक खात्यात जमा केले असून हे पैसे नक्की कोणी काढले, कोणी खाल्ले कोणी परत बँक खात्यात जमा केले, याची चौकशी व्हावी अशी मागणी सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केली.

दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंदवीण्याबाबत लेखी कळविले असता त्यांनी गुन्हा भिवंडी येथील कार्यालयात शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडल्याने तेथे नोंदविण्यात यावा असे लेखी पत्र दिल्याने उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी सक्षम अधिकारी यांना नेमून तसे पत्र दिले.त्यानंतर सायंकाळी उशिरा हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

महिला ठिणगीच्या कार्यकर्त्यांचा गनिमीकावा

श्रमजीवी संघटना बुधवारी आंदोलन करीत असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांना दिले असताना पैसे शासन खात्यात जमा झाले असून गुन्हे नोंदविण्यात येत आहे त्यामुळे धरणे आंदोलन न करण्याबाबत श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना पत्र दिले होते.दरम्यान आंदोलनकर्ते कार्यालयावर धडकणार म्हणून प्रांत कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र आंदोलन सुरू होण्या पूर्वीच महिला ठिणगीच्या आंदोलक महिला कार्यकर्त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल होत मुख्य आंदोलक बाहेर येताच या महिलांनी कार्यालयाच्या प्रांगणातच घोषणा देत आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.  

टॅग्स :Bhiwandiभिवंडी