शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

५६ शेतकरी इस्रायल दौऱ्यावर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 03:53 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पुढाकार : ८९ लाखांचा खर्च; आधुनिक शेतीचा करणार अभ्यास

ठाणे : अत्याधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी ठाणे जिल्ह्यातील ५६ शेतकºयांसह ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे (टीडीसीसी) १९ संचालक आणि दोन अधिकारी यांना इस्रायलच्या अभ्यास दौºयावर जाण्याची संधी मिळणार आहे. बँकेतर्फे यासाठी सुमारे ८९ लाखांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील आणि उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कमी पावसाच्या पाण्यात अत्याधुनिक प्रकारे शेती कशी केली जावी तसेच ठिबक सिंचन, वराहपालन अशा अनेक बाबींचा अभ्यास याठिकाणी शेतकºयांना करता येणार आहे. त्याचा लाभ टीडीसीसी बँकेच्या कर्जदार शेतकºयांना तसेच शेतकरी म्हणून शेती संस्थांमधून निवडून आलेल्या ५८ शेतकºयांना मिळणार आहे. या पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष बाबाजी पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर उपस्थित होते. यासाठी संचालक मंडळाच्या निर्णयानंतर राज्याच्या सहकार आयुक्तांनीही परवानगी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. फेब्रुवारी २०१९ च्या दुसºया आठवड्यामध्ये हा दौरा होणार आहे. दौºयासाठी एक कोटी ५६ लाखांची बँकेने तरतूद केली आहे. त्यातील प्रत्येकी एक लाख १० हजार असा सुमारे ८९ लाखांचा हा खर्च अपेक्षित आहे. डहाणूतील चिकूचे पीक घेणारे, माहीम, वसई तसेच जिल्ह्यातील इतर शेतकºयांना याचा लाभ होणार आहे. बँकेच्या १९ संचालकांनाही सहकार प्रशिक्षण मिळणार आहे.ई-पासबुक प्रणालीचे उदघाटनयंदापासून प्रथमच बँकेच्या ग्राहकांना ई-पासबुकसाठी विशेष अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटनही यावेळी अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. खातेदाराला काही कारणास्तव आपले खाते तात्पुरते बंद करायचे असल्यास तशीही सुविधा या अ‍ॅपद्वारे पुरवली आहे. याशिवाय, अनेक स्टेटमेंटसह अनेक सुविधा यात असल्याचे ते म्हणाले.सचिवांचे पगार टीडीसीसी करणारठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत ४०२ शेती संस्था असून त्यामध्ये ११० सेवा संस्था आहेत. त्यातील ११० सचिवांच्या दोन कोटी ५६ लाख ५६ हजारांच्या वेतनाचा वार्षिक भारही बँकेतर्फे उचलला जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात ६८.६६ कोटी कर्जाचे वितरणजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २०१८-२०१९ या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यात ६८.६६ कोटी, तर पालघर जिल्ह्यात ६१.०७ कोटी असे १२९.७३ कोटींचे पीक कर्ज शेतकºयांना वाटप केल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे