शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षीय महिलेची ५० फूट उंचीवरुन धडपड; मनाला भारावून टाकणारी संघर्षमय कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 19:01 IST

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती.

मुरबाड : तालुक्यातील आदिवासी शेतमजुरांना रोजगाराचे साधन नसल्यामुळे ते जीवाची जोखीम पत्करून कोणतेही काम करत आहेत. झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा  (वय ५५) ही आदिवासी महिला पोटाची खळगी भरण्यासाठी ५० फूट उंच बेलाच्या काटेरी झाडावर चढून बेलाची पाने काढत आहे. ही पाने कल्याण, ठाणे आणि मुंबई या शहरांत विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. 

कष्टकरी आदिवासींना कायमचा रोजगार नसल्यामुळे रोजगारासाठी त्यांना घाटमाथ्यावर असलेल्या आळेफाटा, जुन्नर, पुणे, नाशिक, जळगाव, पालघर याठिकाणी भटकंती करावी लागते. या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती खुंटलेली आहे. 

झुगरेवाडी येथील कांताबाई सावरा ही महिला तरुण वयातच जंगलात शेळ्या चारायला जात होती. तेव्हा तिला एक बेलाचे झाड दिसले. ही पाने देवपूजेसाठी वापरली जात असल्यामुळे तिने ती टोपली भरून घरी आणली आणि दुसऱ्यादिवशी ती पाने मंदिराशेजारी जाऊन विकली. त्यातून मिळालेले पैसे तिने आपल्या वडिलांच्या हातात दिले.  

यानंतर हा तिचा कायमचाच रोजगार झाला. लग्न झाल्यानंतरही तिने हा व्यवसाय सुरू ठेवला. बांबूची ४० ते ५० फुटांची शिडी लावून ती बेलाची पाने काढते. तिचा पती शेतात काबाडकष्ट करत असताना ती पतीला आर्थिक हातभार लावत आहे.  त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्यरीत्या सुरू आहे.

वयाच्या पंधरा वर्षांपासून मी हे काम करत आहे. वडिलांनी गावातच माझे लग्न लावून दिले. मी लग्नानंतरही हे काम सोडले नाही. आता पती, दोन मुले व नातवंडे असा परिवार असून, हा व्यवसाय त्यांचा आधार बनला आहे. - कांताबाई सावरा

टॅग्स :thaneठाणे