शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ५४ ठिकाणची धूळनियंत्रण यंत्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:45 IST

पीपीपी तत्त्वाचा प्रयोग फसला : वर्षभरापासून प्रशासन ढिम्म

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील धुळीच्या प्रमाणाची माहिती ठाणेकरांना व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरातील तब्बल ५४ ठिकाणी धूळनियंत्रण यंत्रणा बसविली होती. पीपीपी तत्त्वावर ती कार्यरत होती. मात्र, मागील वर्षभरापासून ती धूळखात असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराने जाहिरातीपोटीचा रग्गड मलिदा लाटून पालिकेचे नुकसान केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केल्याची माहिती गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली.महासभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला नगरसेविका नंदिनी विचारे यांनी या विषयाला हात घातला. शहरात बसविण्यात आलेली धूळनियंत्रण यंत्रे सुरू आहेत का, त्यांची सध्याची काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी मागितला. परंतु, संबंधित यंत्रणा बंद असल्याची माहिती देऊन प्रदूषण नियंत्रण खात्याने संबंधितांचा ठेका रद्द केल्याचेही सांगितले.महापालिकेने शहरातील १२ प्रमुख चौकांत ५४ धूळनियंत्रण यंत्रे तीन वर्षांपूर्वी बसविली होती. ठाणे स्थानक परिसर, तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी या ठिकाणी ती बसविली होती. याशिवाय, शहराच्या विविध भागांत आणखी दीडशे धूळनियंत्रण यंत्रे बसविण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र, प्रत्यक्षात ती अद्याप बसविलेली नसल्यामुळे पालिकेची घोषणा हवेत विरली आहे.जाहिरात हक्कातून ठेकेदाराने कमविला रग्गड पैसाच्गेल्या वर्षभरापासून शहरातील ५४ धूळनियंत्रण यंत्रे बंद असल्याची बाब गुरुवारच्या महासभेत उघड झाली. ही यंत्रे पीपीपी तत्त्वावर बसविली होती. त्यासाठी ठेकेदाराला जाहिरात हक्क दिले होते.च्मात्र, देखभाल दुरु स्ती अभावामुळे ती बंद पडली असली, तरी ठेकेदार मात्र जाहिरातींच्या हक्कातून रग्गड पैसे कमावित होता, असा मुद्दा नगरसेवकांनी सभागृहात निदर्शनास आणला. त्यावर प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे ही यंत्रे बंद पडल्याचे सांगितले.च्याबाबत वारंवार सूचना करूनही त्याच्याकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे त्याचा ठेका रद्द केला आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सभेत दिली.आता बसविणार नवी वायुयंत्रणा : मानवी आरोग्यास हानिकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्र ॉन आकारमानाचे धुलिकण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम धूळनियंत्रण यंत्र करीत होते. त्यासाठी या यंत्रात विशिष्ट प्रकारचे पंखे बसविण्यात आले होते. ही यंत्रे पाच फूट उंच आणि अडीच फूट रु ंद होती. मात्र, ती देखभाल दुरु स्तीअभावी बंद पडल्याने त्याऐवजी आता मुंबईच्या धर्तीवर वायू नावाची यंत्रे बसविण्यासाठी पालिकेने चाचपणी सुरू केली आहे. ही नवी यंत्रे धुलिकण आणि वायुप्रदूषण रोखतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.