शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार शहरांत 5052 धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:24 IST

महापालिका जबाबदारी घेणार का? : स्ट्रक्चरल आॅडिट झाले, पुढे काय?

ठाणे : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले, तर मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. त्यानंतर, ठाण्यासह जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानुसार ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका व अंबरनाथ नगरपालिका हद्दीत आजच्या घडीला पाच हजार ५२ इमारती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

धोकादायक इमारतींमध्ये लाखो रहिवासी आजही आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्यात आलेले आहेत. मात्र, रहिवासीसुद्धा त्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला १०३ अतिधोकादायक, तर ४२८० धोकादायक इमारती असून अतिधोकादायक इमारतींमधील ९९ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. कल्याणमध्ये ४७३ इमारती धोकादायक आहेत. उल्हासनगरमध्ये २०७ इमारती धोकादायक आहेत. 4280 धोकादायक इमारती एकट्या ठाणे महापालिका हद्दीत आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ हद्दीतील अशा इमारतींची संख्या ५0५२ आहे. पण पुढे काय? स्ट्रक्चरल आॅडिटसाठी रहिवासी पुढे येत नसल्याने हा प्रश्न सुटू शकला नाही.तज्ज्ञ काय म्हणतात?महापालिकेने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शिवाय, क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करून रहिवाशांचा टांगणीला लागलेला जीव सोडवला पाहिजे. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. त्यावर उपाय झालेच पाहिजेत. -अनिल पाटील - माजी नगरअभियंतामहापालिकेची भूमिकाठाणे महापालिकेच्या माध्यमातून अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच धोकादायक इमारतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी ९५ जणांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यासाठी रहिवासी पुढे येताना दिसत नाही.- अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, अतिक्रमणधोकादायक इमारतींचेपुढे काय?यावर्षी ज्या इमारती धोकादायक यादीत असतात, पुढील वर्षी त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ठाण्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. मात्र, उर्वरित इमारतींमध्ये आजही लाखो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. रहिवासीसुद्धा हक्काचे घर जाईल म्हणून इमारती खाली करीत नाहीत.

टॅग्स :thaneठाणे