शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पाच हजार कोटींचे कोट‘कल्याण’, प्रकल्पांच्या बाबतीत डोंबिवलीच्या तोंडाला मात्र प्रशासनाने पुसली पाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:02 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने मुख्यमंत्री व भाजपाला लक्ष्य केले जात होते. सध्या या महापालिका हद्दीत सरकारने कल्याण-डोंबिवलीच्या विकासाचे पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होऊन येथे वास्तव्य करणा-यांचे कोटकल्याण होणार किंवा कसे, ते पुढील काही वर्षांत स्पष्ट होईल. अर्थात, या जुळ्या शहरातील कल्याणला जेवढा या योजनांचा लाभ होणार आहे, त्या तुलनेत डोंबिवलीच्या पदरात फारसे काही पडणार नाही. मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटी, रिंगरोड, ग्रोथ सेंटर, खाडीपूल, अमृत योजना आणि विकास परियोजना या विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास ५ हजार कोटींची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे सुरू झाली आहेत, तर काही सुरू करण्याकरिता आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.>डोंबिवलीला सापत्न वागणूककल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५ हजार कोटींचे विकास प्रकल्प सुरू असले तरी त्यापैकी २७ गावांत ग्रोथ सेंटर, दुर्गाडी खाडी पूल कल्याण पश्चिमेला मेट्रो रेल्वे, कल्याण पश्चिमेला विकास परियोजना, कल्याण पश्चिमेला अमृत पाणीपुरवठा योजना २७ गावांत होणार आहे. मलनि:सारण योजनेचा केवळ डोंबिवलीला लाभ होईल. स्मार्ट सिटीत एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये कल्याण पश्चिम व पूर्ण स्टेशन परिसर आहे. मोठागाव ठाकुर्ली माणकोली खाडी पूल हा डोंबिवली पश्चिमेत आहे. त्यामुळे विकास हा कल्याण केंद्रित असून मुख्यत्वे कल्याण पश्चिमेला झुकते माप देणारा आहे. डोंबिवलीच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली आहेत.ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ८ हजार ४१६ कोटी रुपये मंजूर. मेट्रो रेल्वेच्या कामाला लवकरच होणार सुरुवात. स्मार्ट सिटी प्रकल्पाला पूरक असलेली विकास परियोजना कल्याण-डोंबिवली महापालिकेने केली तयार. वाडेघर, सापड आणि उंबर्डे याठिकाणी जवळपास ३५० एकर जागेवर ही योजना असेल.योजनेचा इरादा सरकारला सादर केला आहे. कोरियन कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार वाडेघर, सापाड आणि उंबर्डे परियोजनेच्या विकासाला निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. कल्याण ग्रोथ सेंटर हे विकास परियोजनेच्या धर्तीवर असल्याने वाडेघर, सापाड व उंबर्डेचा ग्रोथ सेंटरच्या धर्तीवर विकास होणार आहे. ही परियोजना कार्यान्वित करण्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. किमान ५० टक्के व शक्य झाल्यास 100% गुंतवणूक अथवा निधी कोरियन कंपनीकडून दिला जाण्याची शक्यता आहे. कल्याण-शीळ मार्गावर शीळ ते कोन या दरम्यान एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. याशिवाय, कल्याणमधूनच अलिबाग-विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर होणार आहे. याशिवाय, ठाकुर्ली टर्मिनस होणार आहे. हे टर्मिनस एलिव्हेटेड टर्मिनस करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. त्याआधीच ठाकुर्ली स्थानकाचा मेकओव्हर करण्यात आला आहे. त्यावर जवळपास १७ कोटी रुपयांचा खर्च मध्य रेल्वेने केलेला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या जवळपास ५०० कोटी रुपये खर्चाचे गृह प्रकल्प उभारले जात आहेत. बिल्डरांच्या गृहप्रकल्पांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास एमसीएचआयच्या वतीने १०० कोटी रुपये विकासकामासाठी खर्च करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी काही रस्ते व रस्त्यावरील दुभाजक आणि स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या कामासाठी संघटनेच्या वतीने ४० कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे. सीएसआर अ‍ॅक्टिव्हिटीअंतर्गत हे पैसे खर्च केले जातील. - रवींद्र पाटील, उपाध्यक्ष, एमसीएचआयविकासाची दोरी भाजपाच्या हाती...स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे प्रकल्प, रिंग रोड, ग्रोथ सेंटर, दुर्गाडी खाडी पूल, मोठागाव ठाकुर्ली माणकोली खाडी पूल या योजनेचे काम एमएमआरडीएकडून केले जाणार आहे. अमृत योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केले जाणार आहे. त्यामुळे विकासाची सगळी सूत्रे एमएमआरडीएचे अध्यक्ष असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हाती ठेवली आहेत.>कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी :२ हजार ३०० कोटींचा प्रस्ताव. एकूण २८ प्रकल्प. एरिया बेस व पॅनसिटी अंमलबजावणी. एकूण खर्चापैकी ४०० कोटी कल्याण स्टेशन परिसर विकासासाठी. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कल्याण-डोंबिवली खाडीकिनारा विकास. केंद्र व राज्याकडून अनुक्रमे ९० व ४५ कोटी स्मार्ट सिटी निधी प्राप्त. त्यातून खाडीकिनारा विकास. मेरीटाइम बोर्डाची मंजुरी.>कल्याण ग्रोथ सेंटरएकूण अपेक्षित खर्च १ हजार ८९ कोटी रुपये. २७ गावांतील १० गावांत प्रकल्पाची उभारणी व पहिल्या टप्प्यात पाच गावांचा समावेश. १ हजार ८९ हेक्टर क्षेत्रावर योजना राबवण्याची प्रक्रिया सुरू.>अमृत योजना१६० कोटींची २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना. कल्याण-डोंबिवलीकरिता १५७ कोटींची मलनि:सारण योजना.>कल्याण-डोंबिवली रिंगरोड :एकूण ८०० कोटी खर्चाचा प्रकल्प. त्यापैकी ३९० कोटींच्या कामाला सुरुवात. दुर्गाडी ते गंधारे रिंगरोडच्या कामाला प्रारंभ.>डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली खाडी पूल :२२३ कोटी रुपये मंजूर.काम सुरू होऊन वर्ष झाले.>कल्याण-भिवंडी दुर्गाडी सहापदरी खाडीपूल :७३ कोटी रुपये मंजूर. कामाला सुरुवात होऊन वर्ष पूर्ण.>स्वच्छ भारत अभियान११४ कोटी रुपये मंजूर. त्यातून आधारवाडी डम्पिंग ग्राउुड बंद करणे, बारावे व उंबर्डे येथे अनुक्रमे २५० व ३५० मेट्रीक टनाचा शास्त्रोक्त प्रकल्प उभारणे. ३३ टक्के रक्कम सरकारकडून उपलब्ध. त्यापैकी पहिला १९ कोटी रुपयांचा हप्ता महापालिकेस प्राप्त. ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के निधी द्यावा, अशी आ. नरेंद्र पवार यांची मागणी.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका