शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उल्हासनगर महापालिकेची थकीत ५०० कोटींची पाणीपट्टी माफ, शासनाचा निर्णय

By सदानंद नाईक | Updated: March 13, 2023 09:16 IST

महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती.

उल्हासनगर : महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची पाणीपट्टी थकबाजीची रक्कम दंडासह ७०० कोटीवर गेली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी पाणीपट्टीची ७०० पैकी ५०० कोटींची दंडात्मक रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बैठकीला महापालिका अधिकारी व स्थानिक नेते उपस्थित होते. 

उल्हासनगर महापालिकडे स्वतःचे पाणी स्त्रोत नसल्याने, एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला होतो. महापालिकेला १२० एमएलडी पाण्याचा कोटा मंजूर असून त्यावरील पाण्यासाठी १२ रुपये प्रति एमएलडी असा दीडपट दर आकारण्यात येत होता. तो दर देखील ८ रुपये प्रति एमएलडी करण्याचा निर्णय उदय सामंत यांनी रविवारी झालेल्या बैठकीत घेतला. अशी माहिती शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मंजूर कोट्यापेक्षा अधिकच्या पाणी पुरवण्यासाठी एमआयडीसी जादा दराने देयक आकारत असल्याने, थकबाकीची रक्कम ७०० कोटीवर गेली. यापूर्वी उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेळा बैठका झल्या होत्या. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने थकबाकी रक्कमे बाबत बैठक होऊन तब्बल ५०० कोटींची दंडात्मक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुद्दल सुमारे २०० कोटी रूपये पुढील दहा वर्षात योग्य हप्त्यात भरण्याची योजना एमआयडीसीने करण्याचे निर्देश उधोगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेला मोठा दिलासा मिळाला असून गेल्या अनेक वर्षापासूनचा थकबाकीची विषय निकाली निघाला आहे. 

सामंत यांच्याकडील बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी बी‌.डी. मलिकनेर, अधीक्षक अभियंता सुधीर नागे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करूणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, अभियंता बी एस पाटील इत्यादी उपस्थित होते. तर शिवसेनेकडून पक्षाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर संघटक नाना बागुल, अरूण आशान, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज आदीजन उपस्थित होते.

स्वतःचा पाणी स्रोतची मागणी शहराच्या हद्दीतून बारामाही वाहणारी उल्हास नदी जात असून नदीतील पाणी उचलून उल्हासनगरला पुरवठा करण्यात येत आहे. त्यापेक्षा नदी किनारी महापालिकेने स्वतःचा पाणी स्रोत निर्माण केल्यास, नागरिकांना मुबलक कमी दरात पाणी मिळणार आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक राजकीय नेत्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUday Samantउदय सामंत