शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ताकरात ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:05 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी झालेल्या विशेष महासभेत मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला भाजपाने मान्यता दिली.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने मंगळवारी झालेल्या विशेष महासभेत मालमत्ता करात ५० टक्के दरवाढीला भाजपाने मान्यता दिली. याविरोधात शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहात थाळीनाद केला. विरोधकांनी काळा पोषाख परिधान करुन करवाढीच्या निषेधाचे बॅनर गळ््यात अडकवले होते.भुयारी गटार योजनेसाठी २२६ कोटी ६५ लाख रुपये, रस्ते बांधणीसाठी २३ कोटी ३५ लाख रुपये, जलवाहिनीसाठी ५६ कोटी १६ लाख रुपये, ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेसाठी २८ कोटी ५५ लाख रुपये कर्ज पालिकेने एमएमआरडीएकडून घेतले आहे. तर काँक्रिटचे रस्ते बांधण्यासाठी १०० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे पाठवला आहे. या कर्जाच्या परतफेडीसाठी पालिकेला वर्षाकाठी सुमारे ४० कोटी हप्त्यापोटी द्यावे लागतात. त्यामुळे २१ आॅगस्ट २०१६ च्या महासभेने निवासी मालमत्ता कराचे दर ५ पैसे ते १ रुपये ६० रुपये तर व्यावसायिक मालमत्ता कराचे दर ८० पैसे ३ रुपये प्रती चौरस फुटामागे निश्चित केले होते. यात चार वर्षांनी ५ टक्के दरवाढ करण्याचे ठरवले होते. परंतु, त्यात अद्याप कोणतीही वाढ झाली नसल्याने पालिकेचे उत्पन्न मर्यादित राहिले. त्यात वाढ करण्यासाठी भाजपाच्या गीता जैन यांनी ५० टक्के मालमत्ता करवाढीचा ठराव मांडला. मात्र या दरवाढीतून काजूपाडा, चेणे, वर्सोवा, काशी, माशाचा पाडा, मीरागाव, महाजनवाडी, घोडबंदर गाव, आदिवासी पाड्यांना वगळून त्यांना पूर्वीचा ५ पैसे प्रती चौरसफुटाचा दर कायम ठेवला. तसेच वाढीव दराची आकारणी १ एप्रिलपासून होणाºया बांधकामांना लागू होणार आहे. जुन्या बांधकामांना पूर्वीच्याच दराने कर आकारणीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करावे लागणार असल्याचे जैन यांनी नमूद केले.