शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अलगीकरण केंद्रातच कोरोनाचे ५० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:36 IST

अलगीकरण केंद्राच्या इमारतीतच तब्बल ५० कोरोना रुग्णांना महापालिकेने दाखल केल्याने आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाईंदर : भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट भागातील पालिकेने सुरु केलेल्या अलगीकरण केंद्राच्या इमारतीतच तब्बल ५० कोरोना रुग्णांना महापालिकेने दाखल केल्याने आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांना पालिकेने अन्य रुग्णालय ताब्यात घेऊन किंवा स्वतंत्र इमारतीत उपचारासाठी ठेवणे आवश्यक होते असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण आणून ठेवल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडेही नसल्याचे समजते.मीरा भार्इंदर महापालिकेने पं. भीमसेन जोशी रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून राखीव ठेवले असून त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु पालिकेने जोशी रुग्णालयातील दाखल ५० कोरोना रुग्णांना शनिवारी न्यू गोल्डन नेस्ट जवळील अलगीकरण केंद्राच्या इमारतीत १६, १७ व १८ व्या मजल्यावर हलवले. त्या ठिकाणी पालिकेने कोरोना रुग्णांना ठेऊन उपचार सुरु केले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी पालिकाचा हा मुजोरी कारभार खपवून घेणार नाही असा संताप व्यक्त केला. या इमारतीत आधीच कोरोनाची लागण नसलेल्या २०० पेक्षा जास्त नागरिकांना अलगीकरणासाठी ठेवले आहे. त्याच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच भर वसाहतीत आणून प्रशासन ठेवत असेल तर हे चुकीचे आहे. ठाणे पालिकेप्रमाणे अन्य खाजगी रुग्णालय वा स्वतंत्र इमारत ताब्यात घेऊन तिकडे कोरोना रुग्णांना ठेवा. या प्रकरणी आपण कोकण विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांशी बोललो आहोत असे सरनाईक म्हणाले. सरनाईकांनी ही माहिती आमदार गीता जैन यांना दिल्यावर त्यांनाही धक्का बसला. पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या ठिकाणी अलगीकरण केंद्रच राहिल, कोरोना रुग्णांना ठेवले जाणार नाही असे आश्वासन त्यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेवकांना दिले होते. परंतु आपण नागरिकांची समजूत काढून ही इमारत अलगीकरण केंद्रासाठी दिली व ते सुरु झाल्याने दिलासा मिळाला. पण असा नागरिकांचा विश्वासघात पालिका करणार असेल तर नागरिक सहकार्य करणार नाही असे जैन यांनी स्पष्ट केले. नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी प्रशासनाचा पोरखेळ सुरु असून या बाबत महापौरांसह कुणालाच विश्वासात घेतलेले नाही. महापौरांनी बैठक बोलावली आहे. तर कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण अलगीकरण केंद्रात हलवल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रमुखांनाही नसल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.>रुग्णांच्या वर्गवारीनुसार केले दाखलउपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, डॉ. बालनाथ चकोर यांनी जोशी रुग्णालयातून अलगीकरण केंद्रात कोरोनाचे ५० रुग्ण दाखल केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. परंतु त्यांच्यासह पालिका प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत कोणतीही माहिती वा प्रतिक्रिया देण्यात आली नाही. तर, रुग्णांच्या स्थितीप्रमाणे वर्गवारी करुन त्यांना स्वतंत्र ठेवा, असे निर्देश असल्याने ५० रुग्णांना अलगीकरण इमारतीत दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या