शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहनच्या बसमध्ये जेष्ठ नागरीकांना मिळणार आता ५० टक्के सवलत, महासभेत प्रस्ताव मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:45 IST

जेष्ठ नागरीकांना परिवहनच्या बसेसमध्ये मिळणारी २० टक्यांची सवलत आता ५० टक्के करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे याचा लाभ ५ हजार २७६ जेष्ठ नागरीकांना होणार आहे.

ठळक मुद्दे५ हजारे २७६ जेष्ठ नागरीकांना मिळणार लाभवार्षिक ५ कोटी १० लाखांचा पडणार बोजा

ठाणे - ठाणे परिवहन सेवेतून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरीकांना आता बस भाड्यात ५० टक्के सवलत मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. परंतु या सवलतीमुळे परिवहनवर पाच कोटी १० लाखांचा बोजा पडणार आहे.                  ठाणे महापालिका क्षेत्रातील जेष्ठ नागरीकांना यापूर्वी मासिक भाड्यात २० टक्के सवलत दिली जात होती. ही योजना २००६ पासून लागू करण्यात आलेली आहे. मात्र, या योजनेचा जेष्ठ नागरीक लाभ घेत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य परिवहन सेवेच्या बस भाड्यात ६५ वर्षावरील नागरिकांना ५० टक्के, नवी मुंबई परिवहन उपक्र मामध्ये ६५ वर्षावरील नागरिकांना ७५ टक्के सवलत दिली जाते. तर बेस्ट उपक्र मात मासिक भाड्यात ५० रु पये तर त्रैमासिक भाड्यात २०० रु पये इतकी सवलत दिली जाते. राज्य परिवहन आणि नवी मुंबई परिवहन उपक्र मातील सवलती पहाता त्या तुलनेत टिएमटीची सवलत फारच कमी आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर परिवहन उपक्र माने जेष्ठांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावास वर्षभरापूर्वी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. ठाणे तहसील कार्यालयाकडून शहरातील ६५ वर्षावरील नागरिकांना ओळखपत्र वितरीत करण्यात येते. २०१६-१७ या वर्षामध्ये तहसील कार्यालयामधून ५ हजार दोनशे ७६ जणांना जेष्ठ नागरिकांची ओळखपत्रे देण्यात आली आहेत.                     त्यानुसार या जेष्ठांना परिवहनच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्मय घेण्यात आला असल्याने परिवहनवर वार्षीक ५ कोटी १० लाख ३२ हजार ११० रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. या तुटीची रक्कम महापालिका परिवहन उपक्र माला अनुदान स्वरु पात देणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त