शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४९७१ रुग्ण आढळले; २६ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 22:38 IST

उल्हासनगरला आज १४३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू आहेत. आता या शहरात १६ हजार १७३ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३८८ आहे. भिवंडीला ९४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार ९७१ रुग्ण सोमवारी आढळून आले. गुढीपाडव्याच्या नूतन वर्षा प्रारंभी रुग्ण संख्येत तब्बल दीड हजार पेक्षा जास्त घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र मृतांची संख्या २६ ने वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन लाख ८५ हजार ६८ झाली असून आतापर्यंत सहा हजार ७३३ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात आजही एक हजार ३९४ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९५ हजार १३१ रुग्ण नोंदले असून आज सहा मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ५११ झाली. कल्याण - डोंबिवलीत दोन दिवसाच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी झालेली दिसत आहे. आज एक हजार ४१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याने या शहरातील एकूण एक हजार २९६ मृत्यूंची नोंद झाली आहे.

उल्हासनगरला आज १४३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू आहेत. आता या शहरात १६ हजार १७३ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३८८ आहे. भिवंडीला ९४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले. येथे आठ हजार ७८२  बाधितांची तर, ३७४ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ३७४ रुग्ण सापडले असून सहा मृत्यू झाले आहेत. या शहरात आता ३५ हजार ३४६ बाधितांसह ८६६  मृतांची संख्या नोंदली आहे. अंबरनाथ शहरात २२८ रुग्ण आढळले असून  एकही मृत्यू नाही. या शहरात आता १३ हजार ८५३ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ नोंद आहे. बदलापूरला २८८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १४ हजार ९९१ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२६ नोंद आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १३४ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहेत. या गांवपाड्यांत २२ हजार ४४० बाधीत झाले असून मृत्यू ६२१ नोंद झालेआहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या