शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या आरएमसी प्लान्टआडून ठामपा अधिकाऱ्यांनी केली ४८ कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:49 IST

शिवसेना नगरसेविकेचा गंभीर आरोप : पालिका प्रशासन मात्र निरुत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वडाळा ते कासारवडवली मेट्रो कामाच्या वृक्षतोडीवरून सध्या वातावरण तापले असतानाच कारशेड उभारण्यासाठी आरएमसी प्लान्टला महापालिकेने जागा दिली आहे. परंतु, तिचे भाडेच पालिका वसूल करीत नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी महासभेत उघडकीस आली. विशेष म्हणजे नियमानुसार भाडे वसूल केले जात नसले, तरी नियमाबाहेर जाऊन मागील वर्षभरापासून काही अधिकाऱ्यांनी तब्बल ४८ कोटींची वसुली केल्याचा धक्कादायक आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. या गंभीर आरोपावर प्रशासन मात्र निरुत्तर झाल्याचे सभागृहात दिसले.गुरुवारी महासभेत प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने मणेरा यांनी आरएमसी प्लान्टसाठी जागा दिली आहे का, त्याचे भाडे वसूल केले जाते का, केव्हापासून जागा दिली आहे, असे अनेक प्रश्न केले. परंतु, त्यांची उत्तरे प्रशासनाला देता आली नाहीत. केवळ एमएमआरडीएकडून आलेल्या पत्रांचा दाखला देऊन नाममात्र दराने भाडे वसूल करण्यात यावे, असे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, अशा पद्धतीने हा प्लान्ट उभारण्यासाठी पालिकास्तरावर जरी मंजुरी दिली असली, तरी त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत आणणे गरजेचे होते, असे मत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. परंतु, पालिकेने तशी कोणतीच तजवीज केली नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.पुढील महासभेत पुरावे सादर करणार : पालिकेने दिलेल्या उत्तरात संबंधित जागा आरएमसी प्लान्टसाठी दिली असली तरी तिचे भाडे वसूल केले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. या जागेचे महिन्याकाठी चार कोटींचे भाडे अपेक्षित धरले, तरी वर्षाचे पालिकेचे ४८ कोटींचे नुकसान झाले असल्याची बाब मणेरा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भाडे वसूल होणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले. नियमानुसार भाडे वसूल होत नसले तरी नियमाबाहेर जाऊन काही अधिकाºयांनी ते वसूल केल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला असता त्याचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते. यानंतर आक्रमक होत त्यांनी या सर्वांची माहिती पुढील महासभेत मीच प्रशासनाला देईल, असे खुले आव्हानही दिले. त्यामुळे आता महापालिकेत आणखी एक भ्रष्टाचार उघड होतो की काय, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे.