शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याचे वार करुन पतपेढी एजंटची ४५ हजारांची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 20:48 IST

ठाण्यातील शिवकृपा या पेतपेढीचा दैनंदिन ठेव प्रतिनिधी सादीक खान याच्यावर कोयत्याचे वार करुन त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे ठाण्याच्या नितीन कंपनीजवळील घटना सोमवारी पहाटेची घटनानौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: येथील कॅडबरी जंक्शन येथून नितीन कंपनीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर शिवकृपा पतपेढी संस्थेचा एजंट सादीक खान (५१, रा. गौतमनगर, हाजूरी, ठाणे) हे सायकलवरुन जात असतांना त्यांच्यावर तिघा जणांच्या एका टोळक्याने कोयत्याने वार करुन त्यांची ४५ हजारांची रोकड जबरीने हिसकावल्याची घटना २१ जानेवारी रोजी पहाटे पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.खान यांनी २० जानेवारी रोजी खारटन रोड, महागिरी, सिडको, खोपट आदी ठिकाणाहून दुपारी ४.३० वा. पर्यंत शिवकृपा पतपेढीची दैनंदिन ठेव योजनेतील रोकड गोळा केली होती. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत काही रक्कम त्यांनी गोळा केली. रात्री पावणे बाराच्या सुमारास ते नितीन कंपनीकडे सेवा रस्त्याने जात असतांना हायवे सर्व्हिस सेंटर च्या समोर एका २५ ते ३० वयोगटातील चोरटयांने त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावली. त्यांनी प्रतिकार करताच त्याच्या दुसºया साथीदाराने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या तिस-या साथीदाराने त्यांचे तोंड दाबले. त्याचवेळी पहिल्याने ही ४५ हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून तिथून पलायन केले. तर इतर दोघांनी त्यांना जबर मारहाण करुन एका रिक्षातून पलायन केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. बी. कवळे हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा