शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

रिक्षा परवान्यामुळे वसईतील ४५ महिलांना रोजगार

By admin | Updated: March 8, 2016 01:45 IST

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरटीओ कार्यालयातून तब्बल ४५ महिलांना रिक्षा परवाने मिळाले असून त्यांना आता आर्थिक उत्पन्नाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध झाले आहे

शशी करपे,  वसईजागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरटीओ कार्यालयातून तब्बल ४५ महिलांना रिक्षा परवाने मिळाले असून त्यांना आता आर्थिक उत्पन्नाचे कायमस्वरुपी साधन उपलब्ध झाले आहे. यात ५ मुस्लीम आणि ४ ख्रिस्ती समाजातील महिलांचा समावेश असून सर्वच महिला पिढीजात वसईतील रहिवाशी असल्याने त्या खऱ्या अर्थाने मराठी भाषिकच आहेत. परिवहन विभागाने काढलेल्या रिक्षा परवाना लॉटरीत वसईतील १ हजार ५३४ जणांचे भाग्य उजळले. त्यामध्ये तब्बल ४५ महिलांचा समावेश आहे. वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विरार येथील कार्यालयात २९ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत विजयी उमेदवारांच्या मराठीची मौखिक चाचणी घेण्यात आली. यासाठी आलेल्या ४५ महिला अस्सल मराठी भाषिक असल्याने उत्तीर्ण झाल्या. चुळणे गावात राहणाऱ्या सिसिल कोलासो (३७) या पहिल्या परवाना विजेत्या ठरल्या. त्यांना उपप्रादेशिक अधिकारी अभय देशपांडे यांच्या हस्ते परवाना देण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत चाललेल्या चाचणीमध्ये ४५ महिला उत्तीर्ण झाल्या असून त्यांना रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये मुस्लीम समाजातील इशरत शेख, नूर हुसेन सय्यद, रुबीना शेख, रेश्मा शेख, अनिशा शेख यांना रिक्षा परवाने मिळाले. तर ख्रिस्ती समाजातील सिसिल कोलासो यांच्यासह गीता पिंटो, व्हियन्नी पिंटो, अनिसिटो फर्नांडीस यांना परवाने मिळाले. उर्वरित ३६ महिला मराठी आहेत. नऊ महिला इतर समाजातील असल्या तरी त्या पिढीजात वसईतील रहिवाशी असून अस्सल मराठी भाषिक आहेत. विशेष म्हणजे सर्व महिलांनी बेधडक मराठी भाषेची चाचणी परिक्षा दिली. यातील सर्वच महिला मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आहेत. अनिता कुडतरकर या वसईतील पहिल्या मराठी रिक्षा चालक होत्या. त्यानंतर या ४५ महिलांनी रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन लायसन्स आणि बॅज काढल्यानंतर रिक्षा परवान्यांसाठी अर्ज केले होते. सर्वच महिलांना आपल्या चाचणी परिक्षेत स्वत: रिक्षा चालवून असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती महिला रिक्षा चालवणार हा खरा प्रश्न आहे. असे असले तरी कायद्यात परवानाधारकाने रिक्षा चालवली पाहिजे अशी कोणतीच अट नसल्याने त्यांना ड्रायव्हर नेमता येते. त्यामुळे या महिलांना रोजगाराचे कायमस्वरुपी साधन निर्माण झाले असून यामुळे महिला स्वावलंबी होण्याचा मार्ग इतर महिलांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी १० महिला बीट मार्शल आणि दामिनीची टीमवसईत चैनस्रॅचिंगच्या वाढत्या घटना आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला बिट मार्शल आता मोटार सायकलवरून वसईत गस्त घालताना दिसणार आहेत. या बिट मार्शल निर्जन रस्ते, शाळा-कॉलेजचा परिसर, बाजारपेठा यासह महिलांचा वावर असलेल्या ठिकाणी बाईकवरून गस्त घालून चोरट्यांवर नजर ठेवणार आहेत. तसेच पोलिसांच्या गस्तीपथकातही सामील होणार आहेत. या दहा बिट मार्शल बिट मार्शल विभागात रुजू झाल्या आहेत. वसई विरार महापालिका पोलिसांना मोटार सायकली देणार आहेत. त्यातील दहा बाईक महिला बिट मार्शलना देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि चार महिला पोलिसांचे पथक जीप गाडीतून वसईत फिरणार आहे. महिलांवर अत्याचार होत असल्याची खबर मिळताच ही टीम घटनास्थळी पोचणार आहे.