शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

तक्रारींसाठीच्या स्टारग्रेड अ‍ॅपचे ४५ लाख खड्ड्यांत

By admin | Updated: July 4, 2017 06:46 IST

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केलेले स्टार ग्रेड अ‍ॅप मागील तीन महिन्यांपासून

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केलेले स्टार ग्रेड अ‍ॅप मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने ते गुंडाळल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात कोणत्या भागात किती खड्डे पडले आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याने ठाणेकरांचा प्रवास पुन्हा खडड््यांतून होत आहे. या अ‍ॅपसाठी पालिकेने ४५ लाखांचा खर्चही खड्ड्यांत गेला आहे.पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि हे खड्डे बुजवण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, याबाबत पालिकेने मागील दोन वर्षांपूर्वी स्टार ग्रेड नावाचे अ‍ॅप सुरू केले होते. याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. हे अ‍ॅप सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यावर खडड््यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला होता. या तक्रारी कार्यवाहीसाठी तत्काळ संबंधित विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कार्यवाही कोणत्या टप्प्यात आहे, याची माहितीदेखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर, खड्डा बुजल्यावरदेखील त्याचा फोटो अथवा माहिती म्हणजेच तुमच्या तक्रारीवर काम पूर्ण झाले असा मेसेज पाठवला जात होता. त्यामुळे शहरातील खडड््यांवर पालिकेने या अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आता पावसाळा सुरू झाला असून शहराच्या विविध भागांत खड्डे पडले आहेत. परंतु, त्यांची तक्रार एकतर फोन करून अथवा प्रभाग समितीत जाऊन सर्वसामान्य ठाणेकरांना द्यावी लागत आहे. काहींनी या अ‍ॅपवर तक्रार करण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, हे अ‍ॅप बंद असल्याची माहिती त्यांच्या निदर्शनास आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला छेडले असता ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने हे अ‍ॅप बंद असल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु, ते सुरू होणार आहे का, असा सवाल केला असता त्यासाठी सध्या तरी कोणताही ठेकेदार पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच या अ‍ॅपवर केलेला खर्च आता खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे.शहरात खड्ड्यांत हरवले रस्ते; वाहतुकीचा वेग मंदावला ठाणे : शहराच्या विविध भागांत पालिकेने रस्ता रुंदीकरणाची कामे केल्यानंतरही रस्त्यांना खड्डे पडले आहे. प्रशासनाने रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचा दावा केला होता. परंतु, तो पावसाने या वर्षीदेखील फोल ठरवला आहे. विविध भागांत पडलेल्या खडड््यांमुळे वाहनांना बे्रक लागून वाहतूकही मंदावली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याची हमी दिली होती. तसेच पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची डागडुजी शिल्लक होती, अशा रस्त्यांवर डांबर टाकण्यात आले आहे. रुंदीकरणानंतर शहरातील पोखरण-२, ३ आदी रस्त्यांची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. शहरात विटावा पुलाजवळील वाहतूक येथे सुरू असलेल्या नव्या पुलामुळे मंदावली आहे. त्यातच, या ठिकाणी पडलेल्या खडड््यांमुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली आहे. तसेच वर्तकनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, घोडबंदर मार्ग, कोपरी, कॅसल मिल आदींसह शहराच्या इतर छोट्या भागांतही रस्त्यांची जागा खडड््यांनी घेतली आहे.दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेमार्फत प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच भरपावसातही ते बुजवण्यासाठी जेट पॅचर या आधुनिक तंत्रज्ञानाची यंदाही मदत घेण्यात आली आहे.असे असूनही शहरात खड्डे वाढते आहेत. तीनहातनाका, नितीन कंपनी, माजिवडानाका येथील रस्त्यावरील खडी उडू लागली असून येथेही खड्डे पडू शकतात. पावसाळ्यापूर्वी पालिकेने घोडबंदर भागातील सर्व्हिस रोडसह इतर भागांत डांबराचा मुलामा लावला. परंतु, डांबरही पावसाने वाहून गेले आहे.शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खडड््यांवर पालिकेने मागील काही वर्षांत विविध स्वरूपाचे अत्याधुनिक उपाय केले आहेत. त्यावर, कोट्यवधींची उधळणही केली आहे. परंतु, तरीही हे अत्याधुनिक उपाय कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.