शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

घोडबंदर पट्याला लाभणार ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच, वाढत्या चोरीच्या घटनांवर बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:36 IST

वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि पोलिसांच्या तपासात मदत कार्य करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता घोडबंदर पट्यात महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी केला जाणार खर्चमहत्वाच्या चौकात लागणार कॅमेरे

ठाणे - चोरांवर वॉच ठेवण्यासाठी गुन्हेगारांना ओळखणे, गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्यासाठी आणि पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन व नियंत्रण करण्यास सोपे जावे यासाठी घोडबंदर पट्ट्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेने आतापर्यंत विविध ठिकाणी बसवलेल्या कॅमेरांमुळे चोरी तसेच अन्य गुन्ह्यांची उकल होण्यास काही प्रमाणात मदत होत असून घोडबंदर पट्ट्यातील आतील परिसरात या कॅमेरांचा चांगलाच उपयोग होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. घोडबंदर पट्ट्यातील महत्वाच्या चौकात आणि महत्वाच्या ठिकाणी जिथून गुन्हेगारांना पळणे शक्य आहे अशा ठिकाणी पोलिसांनी सुचवलेल्या ठिकाणी हे ४४ कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.                             मागील काही महिन्यांपासून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरवात झाली आहे. शहरात काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असले तरी नवीन ठाणे अशी ओळख निर्माण झालेल्या घोडबंदर परिसराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देखील कॅमेरे बसवण्याच्या निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून या प्रस्तावाला स्थायी समितीनेसुध्दा मंजुरी दिली आहे. गुन्ह्यांची उकल जलदगतीने होण्यासाठी अशा प्रकारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत चांगली होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष करून सुनसान परिसर, सर्व्हीस रोड आणि हायवेवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची चांगली मदत होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एखाद्या परिसरात गुन्हा घडला असेल तर यापूर्वी त्या परिसरात जवळपास असलेल्या हॉटेल्स किंवा खाजगी स्वरूपात बसवण्यात आलेल्या कॅमेरांवर अवलंबून राहावे लागत होते. काही ठिकाणी तर कॅमेरेसुद्धा नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष दर्शींवर पोलिसांना अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता शहराच्या प्रवेशद्वारांवर आणि मुख्य चौकात तसेच अन्य महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असल्याने तपासाला देखील वेग आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.           आतापर्यंत कापूरबावडी पर्यंत महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तर पुढच्या पट्ट्यात गायमुख आणि नागला बंदर परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र घोडबंदरचा पट्टा विशेष करून आतील परिसर जिथे या कॅमेऱ्याची खरी गरज आहे अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यानी दिली. घोडबंदर पट्ट्यात बसवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याची संख्या - ब्रम्हांड सिग्नल-८, पातलीपाडा उड्डाणपुलाखाली -७, वाघबीळ जंक्शन -७, आनंदनगर जंक्शन -४, फ्लोरा बिल्डींग -३, हिरानंदानी इस्टेट -३,भूमी एकर सर्कल, वाघबीळ -३, पालिका आयुक्त बंगला -३, ब्रह्मांड जंक्शन -३, आझाद नगर सर्कल -३एकूण कॅमेरे : ४४ - निधी : २५ लाखसंपूर्ण शहरात बसवण्यात येणाऱ्या कॅमऱ्याची संख्या -१६००आतापर्यंत बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याची संख्या ३००, यामध्ये २०० सामान्य कॅमेरे तर १०० वायफाय योजने अंतर्गत, यावर्षी बसवण्यात येणाºया कॅमेºयांची संख्या -१ हजार यामध्ये सामान्य आणि वायफाय योजने अंतर्गत ३०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcctvसीसीटीव्ही