शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

४३३६ अंगणवाडी सेविकांचे मानधन जुन्या पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 04:21 IST

अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते.

ठाणे  - अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. परंतु, दिवाळीच्या मुहूर्तावर हा विषय गांभीर्याने घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ते जुन्या पद्धतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेंबरला जारी केले. यामुळे राज्यभरातील सेविकांना दिलासा मिळून त्यांची दिवाळी गोड झाली आहे.राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडीसेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न केला नाही. यामुळे त्यांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. मात्र, ऐन दिवाळीत त्यांना मानधनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची जाणीव होताच शासनाने हे आदेश जारी केले.परंतु, यानंतरचे मानधन मात्र ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनादेखील जबाबदारीने संबंधित सेविकांकडून आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.‘पीएफएमबी’ प्रणालीत खातेजोडणी करण्यासाठी अंगणवाडीसेविका सहकार्य करत नसतील, तर संबंधित अधिकाºयांबरोबर अंगणवाडी सेविकांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Mumbaiमुंबई