शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

१९ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ४३ लीटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:12 IST

शाईच्या चार हजार ३५४ बाटल्या वितरित

- हितेन नाईक पालघर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. या मतदार संघातील १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांच्या तर्जनीवर हि खूण करण्यासाठी ४३ लिटर्स शाईचा वापर होणार आहे.पालघर लोकसभेचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून जसजशी ही तारीख जवळ येत आहे तसे जिल्हा प्रशासनातील कार्यालयातील निवडणूक विभाग वेगवान पद्धतीने दिवस-रात्र कामात जुंपलेला दिसत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले असून या असंख्य साहित्यापैकी शाईचे महत्वही महत्वपूर्ण समजले जात आहे.पालघर लोकसभा मतदारसंघात अशा एकूण २ हजार १७७ मतदान केंद्रावर प्रत्येकी दोन अशा एकूण ४ हजार ३५४ शाईच्या बाटल्या वितरित करण्यात येणार आहेत. एका बाटलीत १० मिली. निळी शाई भरण्यात आलेली असून एक बाटलीतील शाई सुमारे ५०० मतदारांच्या तर्जनीवर लावण्यास पुरेशी मानली जाते. त्यामुळे एका मतदान केंद्रावर दोन बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. वर्ष २००४ च्या निवडणुकीत मतदान करताना मतदारांच्या बोटावर केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्या ऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिल्याने जास्त शाईचा वापर होत आहे. मतदान केंद्रात आल्यावर शासनप्राप्त ओळ्खपत्राद्वारे मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याला मतदान करण्यासाठी आत प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी वर शाई लावल्या नंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनी वर शाई लागलेली असेल तर त्या मतदारांना मतदान करू दिले जात नाही.कोणत्या बोटावर लागते शाईमतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.म्हैसूरची शाईयासाठी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीतून जगातील २५ देशांना तीचा पुरवठा केला जातो. ही शाई लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही.१९६२च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर