शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

४३ हॉटेलचे परवाने निलंबित; एफडीएकडून कोकण विभागातील हॉटेल्सची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 02:41 IST

- पंकज रोडेकर ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने एफडीएच्या कायद्यानुसार नियमांची पूर्तता होते किंवा नाही यासाठी कोकण ...

- पंकज रोडेकरठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने एफडीएच्या कायद्यानुसार नियमांची पूर्तता होते किंवा नाही यासाठी कोकण विभागातील टॉप-२० मधील ७९५ हॉटेलची झाडाझडती सुरू आहे. आतापर्यंत ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली असून त्यातील ३९१ हॉटेलचालकांना सुधारणा नोटिसा बजावल्या आहेत. तर ४३ हॉटेलचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच ३२२ हॉटेलची प्रकरणे फेरतापसणीसाठी प्रलंबित असल्याची माहिती एफडीएच्या सूत्रांनी दिली.ठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. सद्य:स्थितीत कोकण विभागात एकूण टॉप-२० मधील ७९५ हॉटेल्स आहेत. त्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार, स्वच्छता आणि आरोग्यविषयक विशेष बाबींची पूर्तता होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी एका अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याला २० हॉटेलची जबाबदारी दिली आहे.एफडीएचे कोकण विभागाचे सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर २०१८ पासून या तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार जानेवारी अखेरपर्यंत जवळपास ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ५४२ सर्वाधिक हॉटेल्स ही ठाणे-पालघर जिल्ह्यात आहेत. तर ४० टॉप-२० चे सर्वात कमी हॉटेल्स ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. हॉटेलचालकांना तपासणी दरम्यान कायद्यानुसार पूर्तता नसेल तर त्यांना सुरुवातीला सुधारणा नोटीस बजावली जाते. या १५ दिवसांच्या नोटिसीमध्ये त्याला सुधारणा करण्याची संधी मिळते. त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाते. पुन्हा होणाºया तपासणीत हॉटेलचालकाने सुधारणा केलेली नसेल तर त्याला दंडाची शिक्षा नसून थेट त्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद कायद्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार, आरोग्य आणि स्वच्छतेच्या विशेष बाबींची तपासणी करताना हॉटेल्सचे किचन, गोडाउन तेथे साठवलेले पदार्थ तसेच पाणी अशा ५७ ते ५८ बाबींची तपासणी प्रामुख्याने केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.३४ हॉटेलची तपासणी बाकीएका सहायक आयुक्ताला जास्तीत जास्त पाच आणि कमीत कमी दोन अधिकाºयांमार्फत या मोहिमेत हॉटेलची तपासणी केली जात आहे. तसेच एका अधिकाºयाला साधारणत: २० हॉटेल्स दिली आहेत. त्यानुसार ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली आहे. तर ३४ हॉटेलची तपासणी बाकी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.ठाणे-पालघरमध्ये सर्वाधिक परवाने निलंबिततपासणीत ४३ हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये ३२ हॉटेल्स ही ठाणे-पालघरमधील आहेत. त्यापाठोपाठ ९ रायगड आणि २ हॉटेल्स ही सिंधुदुर्गमधील आहेत. विशेष म्हणेज रत्नागिरीतील निलंबित हॉटेल्सची संख्या शून्य आहे.

टॅग्स :FDAएफडीएthaneठाणे