शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जून महिन्यात दहा दिवसात ४३ जणांचा मृत्यु कोरोनाच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ, १० दिवसात ६६९ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:48 IST

ठाण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय योजले जात आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मागील १० कोरोनाचे नवीन १५८४ रुग्ण आढळून आले आहेत. यात ४३ जणांचा मृत्यु झाला आहे.

ठाणे : ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांनाच दिसत आहे. १० जून पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४४८५ एवढी असून आतापर्यंत २०१२ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. तर १३७ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु मागील १० दिवसात शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून या १० दिवसात १५८४ रुग्ण वाढले असून याच कालावधीत ४३ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु दुसरीकडे याच कालावधीत ६६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.           मागील २१ मार्च पासून देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. त्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण दिसू लागले. परंतु सुरवातीला हा आकडा १ ते १० च्या मध्ये होता. त्यानुसार मे अखेर पर्यंत शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २९०१ कोरोनाचे रुग्ण होते. तर याच कालावधीत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही १३४३ एवढी होती. मात्र जेव्हा पासून कोरोनाने झोपडपटटी भागात शिरकाव केला, तेव्हा पासून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. लोकमान्य नगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा, कळवा, माजिवडा मानपाडा, उथळसर, मुंब्रा आदी भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या माध्यमातून झोपडपटटी भागात प्रत्येक घरा घरातून ताप सर्व्हेक्षण मोहीम सुरु केली आहे. त्यात आता पावसाळा सुरु होत असल्याने रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढेल असेही दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरु झाला आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या कालावधीतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. शहरातील खाजगी कंपन्याही काही अंशी सुरु झाल्या आहेत, तसेच बसेसही, मार्केटही सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरीकांची मार्केटमध्ये बसमध्ये, कामाच्या ठिकाणी काही अंशी गर्दी वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होणार असल्याचे दिसत आहे. जूनचाच विचार केला तर मागील १० दिवसात कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्याचे दिसत आहे. मागील १० दिवसात शहरात १५८४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. रोज शहरात १३० हून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सुदैवाने याच कालावधीत ६६९ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही जरी जमेची बाजू असली तरी या कालावधीत मृत्युचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले. मागील १० दिवसात ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या