शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

४२ लाख ‘परदेशीबाबू’ यूपीच्या वाटेवर; तिसऱ्या लाटेमुळे अगोदरच धरली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 11:25 IST

महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.

- संदीप प्रधान ठाणे : मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तब्बल ४२ लाख उत्तर भारतीय उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता तिकडे निघाले आहेत किंवा अनेक जण कोरोनाच्या भीतीने अजून तिकडेच आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका व मुंबई महापालिका निवडणूक साधारणपणे जवळपास येत असल्याने या मतदाराला तिकडे जाण्यापासून रोखण्याकरिता राजकीय पक्षांना धडपड करावी लागते. मात्र यावेळी महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.उत्तर प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने उत्तर प्रदेशातील जी मंडळी पोटापाण्याकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत वास्तव्य करतात त्यांनी गावाकडची वाट धरली. दुसऱ्या लाटेच्या वेळी उ.प्र.मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी येथील मंडळींनी तिकडे धाव घेऊन मतदान केले होते, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस अरविंद तिवारी यांनी लक्ष वेधले.  उत्तर भारतीय महापंचायतचे विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्रात ८० लाखांच्या आसपास उत्तर भारतीय असून त्यापैकी ४२ लाख हे तिकडे व येथे मतदार आहेत. कोरोनामुळे त्यापैकी २५ टक्केच परतले. उर्वरित तिकडेच असून यावेळी मतदान करतील. उ.प्र.मधील ४८ टक्के तरुण यावेळी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करतील व त्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तरुण आहेत. मुंबईत पत्रकारिता केलेले व समाजवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार रामकिशोर त्रिवेदी म्हणाले की, मुंबईत येणारे बहुतांश उत्तर भारतीय पूर्वांचलमधून येतात. मागील वेळी त्यांनी भाजपला मते दिली. मात्र, सध्या या भागात मोकाट जनावरांचा प्रश्न तापला असून, त्यामुळे सरकारविरोधी वातावरण आहे. पत्रकार व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला म्हणाले की, पूर्वांचलच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे राजकारण जातीपातीभोवती फिरते. मात्र यावेळी भाजपने लाभार्थ्यांची नवी जातकुळी निर्माण केली आहे. २४ कोटींच्या उ.प्र.मध्ये १८ कोटी लोक केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत. पाच कार्यकर्त्यांचा एक गट याप्रमाणे गट करून वेगवेगळ्या विभागात लाभार्थ्यांच्या याद्या घेऊन हे कार्यकर्ते जातील व लोकांना मतदानाकरिता आवाहन करतील.भोजपुरी इंडस्ट्री मैदानात भोजपुरी स्टार्स निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रवीकिशन, दिनेशलाल यादव तथा निरुव्वा, मनोज तिवारी हे भाजपकरिता प्रचार करणार असून खेसारीलाल यादव हे समाजवादी पार्टीकरिता मैदानात उतरणार आहेत.