शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात नव्याने ४११ कोरोना रु ग्णांची नोंद: सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:26 IST

जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार २०९ इतकी बाधितांची तर पाच हजार ८१६ जणांच्या मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी १२२ बाधितांची तर तिघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ४२५ तर एक हजार २७१ जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यापाठोपाठ नवी मुंबईमध्ये ८० रु ग्णांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी ४९ हजार ६५३ इतकी बाधितांची तर एक हजार १४ मृत्युची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये १०८ नविन रुग्ण दाखल झाले असून एकाचा मृत्यु झाला. त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ७५१ तर मृतांची संख्या एक हजार ८१ इतकी झाली. मीरा भार्इंदरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ हजार ४५३ तर मृतांची संख्या ११० इतकी झाली. भिवंडी निजामपुर महापालिका क्षेत्रात चार नविन रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ३६२ तर मृतांची संख्या ३४८ इतकी स्थिर राहिली आहे. उल्हासनगरमध्ये पाच रु ग्णांच्या नोंदीमुळे बाधितांची संख्या ११ हजार १५९ झाली असून मृतांची संख्या ३५६ इतकी स्थिर राहिली. अंबरनाथमध्येही १६ रु ग्णांच्या नोंदीमुळे आठ हजार ८६ इतकी बाधितांची संख्या झाली. तर बदलापूरमध्ये २२ रु ग्णांची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या आठ ४५३ तर मृतांची संख्या ११० झाली. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण भागात १७ रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ४६७ झाली असून मृतांची संख्या ५७१ इतकी स्थिर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस