शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 05:05 IST

मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले.

ठाणे : मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणणारे आरोपी फरार झाले आहेत.ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ज्यांचे नातेवाईक किंवा पालक पुढे आले त्या २० जणांना त्यांच्या हवाली केले. तर उर्वरित २० जणांची भिवंडी आणि उल्हासनगर बालसुधारगृहात रवानगी केली असून, या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा मुले तस्करीचा प्रकार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.प्रथम संस्थेच्या बिहारमधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना ५६ मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेने पालवी चॉईल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने शनिवारी बिहार येथून आलेल्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरलेली ४० मुले ताब्यात घेतली. त्यांना ठाणे-मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वांत जास्त मुले ही १४ वर्षांखालील आहेत. त्या ४० मुलांमध्ये ज्या-ज्या मुलांचे नातेवाईक अथवा पालक ठाणे-मुंबई किंवा आजूबाजूच्या शहरांत राहत आहेत. त्यांची आणि मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, २० मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांची बालसुधारगृहांत रवानगी केल्याची माहिती कल्पना जाधव यांनी दिली.दोन महिन्यांपूर्वी मुलुंड परिसरातून अशा प्रकारे ३२ अल्पवयीन मुलांची सुटका केली होती. त्या वेळी मुलांना बिहार येथून आणणाºयांविरोधात मुलुंड पोलीसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.