शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 13:39 IST

पवई चौकातील अंबिका इमारतीमधील पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून साडेतीन वर्षांचा नीरजचा मृत्यू झाला.

- सदानंद नाईकउल्हासनगर : पवई चौकातील अंबिका इमारतीमधील पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून साडेतीन वर्षांचा नीरजचा मृत्यू झाला. तर आजी पंचशीलाबाई जखमी झाली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४ पवई चौकातील अंबिका इमारती असून, सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास 5 व्या मजल्याच्या स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून घरात खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या नीरज सातपुते याचा जागीच मृत्यू झाला.तर निरजची आजी पंचशीलाबाई जगताप गंभीर जखमी झाला आहे. आपत्कालीन विभागाचे प्रमुख गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सुरेक्षाचा उपाय म्हणून इमारतीतील तब्बल 25 प्लॉटधारकांना बाहेर काढण्यात आले. महापालिकेने त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र प्लॉटधारकांनी मित्र व नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. सदर इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत नसून अश्या शेकडो इमारती शहरात असल्याचे बोलले जात आहे.अंबिका इमारत 20 वर्षांपूर्वीची जुनी इमारत असून, इमारतीत एकून 25 प्लॉट व तळमजल्यावर तीन दुकाने आहेत. 4 वर्षांच्या निरजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सव्वा दोनशे इमारती अतिधोकादायक व धोकादायक असून, अंबिका सारख्या इमारतीची संख्या शेकडोच्या शहरात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी केला आहे. तर आयुक्त सुधाकर देशमुख घटनेकडे लक्ष ठेवून असून 20 वर्ष जुन्या इमारतीचे स्ट्रॅक्चर ऑडिट करण्याचे संकेत दिले आहे.