शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

सेंच्युरी रेयॉनमध्ये टँकरच्या स्फोटात ४ ठार; मृतदेह ओळखणे झाले कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:00 IST

शहाडमधील दुर्घटनेत ६ जखमी, मृतदेह ओळखणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कारखान्यात शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजता नायट्रोजन गॅस टँकरचा जबरदस्त स्फोट होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील इमारती हादरल्या. चार मृतांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. स्फोट झालेल्या टँकरच्या ठिकाणी मांसाचा सडा पडल्याचे भयानक चित्र होते. कंपनीकडून या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. १ शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी कंपनीतील एका प्लॅंटमध्ये गुजरात येथून नायट्रोजन गॅसचा टँकर आला होता. त्यात कार्बनडाय सल्फर भरण्यात येणार होता. त्याची तपासणी सुरू असताना मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, संपूर्ण परिसर हादरला. शहाड व आजूबाजूच्या तानाजीनगर, गुलशननगर, धोबी घाट,  शिवनेरीनगर परिसरातील घरांना हादरे बसले. येथील इमारतींमधील रहिवासी भीतीने रस्त्यावर आले. सेंच्युरी कंपनीत स्फोट झाल्याचे समजताच लोक धावत कंपनीच्या दिशेने निघाले. 

मृतांचे नातलग, जखमींना मदतसेंच्युरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी कंपनीमधील स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन जण बेपत्ता असल्याचे सांगितले. सहा जण जखमी झाले आहे. मृतांच्या नातलगांना व जखमी कामगारांना कंपनीकडून मदत देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. स्फोटाची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

मृत आणि जखमींची नावेnस्फोटात टँकरचा चालक पवन यादव आणि प्लॅंटमधील हेल्पर अनंत डिंगोरे यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांचे मृतदेह न मिळाल्याने बेपत्ता घाेषित केले. nगंभीर जखमी शैलेश यादव आणि राजेश श्रीवास्तव या दोघांचाही मृत्यू झाला. स्फोट झालेल्या टँकरशेजारी युरेका कंपनीचा टँकर उभा होता. nटँकर चालक पंडित लक्ष्मण मोरे आणि क्लिनर हंसराज चरोत यांच्यासह सेंच्युरी कंपनीचे कामगार सागर झालटे, अमित भरनुके, प्रकाश अनंत निकम, मोहम्मद अरमान असे सहा जण जखमी झाले आहेत. 

नातेवाईक, नागरिकांची गर्दीnकंपनीत स्फोट झाल्याची माहिती कामगारांच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी व स्थानिक नागरिकांनी कंपनी प्रवेशद्वार आणि रुग्णालयात गर्दी केली होती. कंपनीने सर्व परिसर सील केल्यामुळे कुणालाही अपघातस्थळी सोडण्यात येत नव्हते. nपोलिसांनीही या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. nतर आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी यांच्यासह भाजपचे शहाराध्यक्ष प्रदीप रामचंदानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, नाना बागुल यांच्यासह स्थानिक नेत्यांनी जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर