शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर मार्गवर ट्रेलरने दोन वाहनांना दिलेल्या धडकेत ४ जखमी

By धीरज परब | Updated: September 6, 2023 20:30 IST

आधीच तीव्र वळण त्यात मोठी होर्डिंग्ज असल्याने चालकांचे लक्ष येथे सहज विचलित होते. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. 

मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत घोडबंदर मार्गावरील काजूपाडा येथे एका ट्रेलर चालकाने कार व टेम्पोला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. काजूपाडा येथे तीव्र वळण आहे . त्यातच ह्या तीव्र वळणावर भलीमोठी लांबलचक दोन मोठी होर्डिंग आहेत. आधीच तीव्र वळण त्यात मोठी होर्डिंग्ज असल्याने चालकांचे लक्ष येथे सहज विचलित होते. त्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. 

बुधवारी देखील काजूपाडाच्या सदर तीव्र वळणावर ठाण्या कडून येणाऱ्या व वरसावे नाका दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर एमएच ४६ एएस २३२७ क्रमांकाच्या ट्रेलर चालकाचे सदर वळणावर नियंत्रण सुटले . त्याने लगत असलेल्या एमएच ०३ डीएक्स ३२०८ क्रमांच्या कार आणि एमएच ०४ केयु ०३९२ क्रमांकाच्या टेम्पोला जबर धडक दिली. 

या धडकेत कार व टेम्पो सह ट्रेलर देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन पडला . त्यात कार चालक , टेम्पोतील चालक व मजूर तसेच ट्रेलर मधील क्लिनर हे जखमी झाले . त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . दरम्यान अपघाता नंतर ट्रेलर चालक पसार झाला. 

वाहतूक पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात पाठ्वण्यासह वाहतूक सुरळीत केली . तसेच अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु केले . या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे .तर टेम्पोतील मजुराच्या फिर्यादी वरून पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रेलर चालकावर भादंवि , मोटार वाईन कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे . मात्र जखमींची नावे पोलिस ठाण्यात सायंकाळ पर्यंत उपलब्ध नव्हती. 

टॅग्स :mira roadमीरा रोडAccidentअपघात